आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Underworld Don Daughter Geeta Gawli Maharashtra Vidhansabha Election

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची कन्या लढवणार भायखळ्यातून विधानसभा निवडणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीतील खास माहिती देण्यासाठी 'Political Fever@महाराष्ट्र' ही विशेष मालिका आम्ही सुरु करत आहोत. आजच्या भागात एका महिला उमेदवाराची माहिती देणार आहोत. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची कन्या गीता गवळी या भायखळा येथून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

गीता गवळी या मुंबई महापालिकेच्या नगरसेविका आहेत. अरुण गवळी यांच्या कन्या असल्याने नव्हे तर आपल्या वॉर्डमध्ये चांगली विकास कामे करणार्‍या नगरसेविका म्हणून गीता गवळी यांची जनमानसात ओळख आहे.

गीता गवळी या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदार क्षेत्रातून निवडणूक लढवणार आहे. गीता गवळी पहिल्यादा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

डॉन अरुण गवळीचा पक्ष अखिल भारतीय सेना पक्षातर्फे यापूर्वी गीता यांनी नगरसेवक पदासाठी दोनदा निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे दोन्ही वेळा गीता गवळी मोठ्या मताधिक्याने न‍िवडूनही आल्या होत्या. गीता गवळी सध्या मुंबई महापालिकेच्या नगरसेविका आहेत. डॉनची कन्या असल्याना गीता गवळीची जनमानसात चांगलीच क्रेज आहे.

डॉन अरुण गवळीनेही लढवली होती निवडणूक...
अखिल भारतीय सेना पक्षातर्फे 2004 मध्ये डॉन अरुण गवळी यानेही चिंचपोकळी मतदार क्षेत्रातून निवडणूक लढवली होती. अरुण गवळी विजय होऊन आमदारही झाले होते. परंतु शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अरुण गवळीला अटक केली होती. अरुण गवळी सध्या नवी मुंबईतील तलोजा कारागृहात शिक्षा भोगत आहे.

भायखळा विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेसला देणार टक्कर...
भायखळा विधानसभा क्षेत्रातील कॉंग्रेसचे आमदार विधायक मधू चव्हाण आणि गीता गवळी यांच्याच लढत होण्याची शक्यता आहे. भायखळामधील दगळी चाळमध्ये डॉन अरुण गवली याचे घर आहे. त्यामुळे आजही या भागात अरुण गवळीचा चांगलाच दबदबा आहे.

'बेस्ट कॉर्पोरटर' गीता गवळी ...
गीता गवळी यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. आपल्या वॉर्डमध्ये चांगली विकास कामे केल्यामुळे 2011मध्ये गीता गवळीला 'बेस्ट कॉर्पोरटर' पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते.
टीव्हीवर लाइव्ह विवाह...
गीता गवळी यांनी 2007 मध्ये अजय गवळीशी विवाह केला होता. गीता आणि अजयचा विवाह सोहळ्याचे मुंबईत टीव्हीवर थेट प्रेक्षपण दाखवण्यात आले होते. अनेक बड्या व्यक्ती विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, नगरसेवक गीता गवळीची खास छायाचित्रे...
(फाइल फोटोअंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुलगी गीता गवळी)