आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी मॅकॅनिकचे काम करत होता हा अंडरवर्ल्ड डॉन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 12 मार्च 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आज (गुरुवारी) विशेष टाडा कोर्टाने अबु सालेम आणि करिमुल्लाह याला आजन्म कारावास सोबतच प्रत्येकी दोन लाख रुपये दंड, ताहीर मर्चंट आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा तर रियाज सिद्दीकीला 10 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम याच्यासह सात आरोपींना विशेष टाडा कोर्टाने दोषी ठरवले आहे. यात मुस्तफा आणि मोहम्मद दोसा, फिरोज राशिद खान, करीमुल्ला शेख ताहिर मर्चेंट याचा समावेश आहे. यापार्श्वभूमीवर आम्ही आपल्यासाठी अबू सलेम हा गॅंगस्टरपासून अंडरवर्ल्डचा डॉन कसा बनला याविषयी माहिती घेऊन आलो आहे.

कोण आहे अबू सलेम...?
- डॉन अबू सलेमचा जन्म 1960 मध्ये उत्तर प्रदेशातील आझमगडमधील एका छोट्या गावात झाला होता. अबू सलेम अब्दुल कय्युम अन्सारी असे त्याचे पूर्ण नाव आहे. त्याला अकील अहमद आजमी, कॅप्टन आणि अबू या नावानेही तो प्रचलीत आहे.
- अबूचे वडील वकील होते. एका अपघाताच त्यांचे निधन झाले होते. नंतर कुटुंबाची आर्थिक परिस्‍थिती डबघाईला आली होती.
- अबू सलेमने अर्ध्यात शिक्षण सोडून मोलमजुरी करणे सुरु केली. उसने आझमगडमध्ये तो त्याने एका गॅरेजवर मॅकॅनिक म्हणून काम केले.
- नंतर तो दिल्लीत पोहोचला. तिथे त्याने टॅक्सी चालवली. नंतर तो मुंबईत आला. मुंबईत सुरुवातीच्या काळात त्याने टॅक्सी चालवली.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या... अबु सालेम गॅंगस्टरचा असा बनला अंडरवर्ल्ड डॉन...
बातम्या आणखी आहेत...