आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबु सालेमचा \'इश्कवाला लव्ह\', रेल्वे प्रवासात फुलले प्रेम, तिसरी प्रेयसी मुंबईत सांभाळते बिझनेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याला टाडा कोर्ट 7 सप्टेंबरला शिक्षा सुनावणार आहे. कोर्ट सालेमला काय शिक्षा सुनावते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अबू सालेमचे नवे प्रेम प्रकरण काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. त्याच्यापेक्षा तब्बल 20 वर्षांनी लहान असलेल्या तरुणीने त्याच्यासोबत निकाह करण्‍याची इच्छा दर्शवली होती. अबुने तिसर्‍या निकाह करण्यासाठी मुंबई आणि दिल्ली हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती.

रेल्वे प्रवासात सुरु झाली लव्हस्टोरी...
अबू सालेमच्या नवी लव्हस्टोरी मुंबई-लखनऊ प्रवासात सुरु झाली होती, हे कदाचित तुम्हाला माहीत नसावे. अबुला पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मुंबईहून लखनऊला कोर्ट सुनावणीसाठी नेण्यात आले होते. या दरम्यान अबूच्या सीटसमोर एक तरुणी बसली होती. ती अबूवर इतकी भाळली की तिने चक्क त्याच्याशी निकाह करण्‍याचा निर्णय घेतला. सैय्यद बहार कौसर असे या तरुणीचे नाव आहे. ती सध्या मुंबईत असून बिझनेस सांभाळते आहे. 

सैय्यद बहार कौसर हीने अबु सालेमसोबत निकाह करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली होती. तिच्या अर्जावर न्यायाधीशांनी सीबीआयला उत्तर मागितले आहे.

काजीने फोनवर लावला निकाह...
- धावत्या रेल्वेत मुंबईच्या काजीने फोनवर निकाह लावल्याचा सैय्यद बहार कौसर हीने दावा केला आहे.
- अबूचा पुतण्या रशीद अन्सारी आणि मुंबई व लखनऊ पोलिसांचे एक-एक जवान, या निकाहाचे साक्षीदार होते, असेही तिने म्हटले आहे.  
- सालेमचे हे तिसरे लग्न असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी त्याने समीराशी लग्न करून तिला तलाक दिलेला आहे. बॉलिवूड अॅक्ट्रेस मोनिका बेदीशीही लग्न केल्यावरून चर्चेत आला होता.

सालेमचा बिझनेस संभाळते
- अबू सालेमच्या नव्या बेगमचे नाव सैय्यद बहार कौसर आहे. ती 27 वर्षांची आहे. सुनावणीदरम्यान अनेकदा टाडा कोर्टात दिसते.
- अबू सालेमचा मुंबईत उरलासुरला 'बिझनेस' सांभाळते, अशीही चर्चा आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... अबु सालेम आणि सैय्यद बहार कौसरचे निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...