आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडरवर्ल्‍ड डॉनची ही मुलगी आहे राजकारणी, टीव्‍हीवर झाले होते विवाहाचे थेट प्रक्षेपण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गीता गवळीचे वडील अरुण गवळी यांच्‍यावर बनलेल्‍या सिनेमामध्‍ये अर्जुन रामपाल यांनी अरुण गवळीची भूमिका केली आहे. - Divya Marathi
गीता गवळीचे वडील अरुण गवळी यांच्‍यावर बनलेल्‍या सिनेमामध्‍ये अर्जुन रामपाल यांनी अरुण गवळीची भूमिका केली आहे.
मुंबई- एकेकाळी दक्षिण मुंबईच्‍या गुन्‍हेगारी विश्‍वावर राज्‍य करणारा अरुण गवळी सध्‍या तुरुंगात आहे. मात्र त्‍याने स्‍थापन केलेला 'अखिल भारतीय सेना' पक्ष अजूनही मुंबईच्‍या राजकारणात आहे. नुकतेच या पक्षाने मुंबई महापालिकेच्‍या निवडणुकीत भाग घेतला होता. त्‍यामध्‍ये अरुण गवळीची मुलगी गीता गवळी निवडुन आल्‍या आहेत.
 
मुंबई महापौरपदासाठी गीता गवळी यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर करत भाजपमध्‍ये प्रवेश केला होता. याबदल्‍यात गीता गवळी यांना  स्‍थायी समितीचे सभापतीपद देण्‍याची ऑफर भाजपने दिली होती, अशी चर्चा माध्‍यमांमध्‍ये होती. मागील 12 वर्षांपासून गीता गवळी शिवसेनेला पाठिंबा देत होत्‍या. त्‍यामुळे त्‍यांच्‍या या भूमिकेने सर्वांचे लक्ष त्‍यांच्‍याकडे गेले होते.
 
 
टीव्‍हीवर झाले होते विवाहाचे थेट प्रक्षेपण
- शिवसेना नेत्‍याची हत्‍या केल्‍याच्‍या आरोपाखाली अरुण गवळी सध्‍या तुरुंगात आहे. त्‍यांचा राजकीय वारसा गीता गवळी पुढे नेत आहे. 
- यंदाच्‍या मुंबई महापा‍लिकेच्‍या निकालानंतर गीता गवळी शिवसेनेच्‍या नेत्‍यांनाही भेटल्‍या होत्‍या. मात्र मुख्‍यमंत्र्यांनी त्‍यांची भेट घेतल्‍यानंतर त्‍यांच्‍या निर्णयात बदल झाला. 
- गीताने याआधीही दोनदा महापालिकेची निवडणुक लढवली आहे.  - दोन्‍हीवेळेस त्‍या प्रचंड बहुमताने निवडून आल्‍या होत्‍या. 
- आपल्‍या वॉर्डात उत्‍तम पध्‍दतीने विकासकार्य केल्‍याबद्दल त्‍यांना 'सर्वोत्‍कृष्‍ट नगरसेवक' हा पुरस्‍कारदेखील मुंबई महापालिकेने दिला आहे. 
- गीता गवळींची आईदेखील पक्षाचे काम पाहते. या निवडणुकीत गीताच्‍या प्रचाराचे पूर्ण काम तिच्‍या आर्इनेच साभांळले होते.
- 2007मध्‍ये मुंबईतील प्रसिध्‍द बांधकाम व्‍यवसायिक अजय गवळीसोबत गीता यांचा विवाह झाला आहे. 
- या विवाहाची इतकी चर्चा झाली होती की, याचे थेट प्रक्षेपण टिव्‍हीवर दाखविले गेले होते. 

सामान्‍य नागरिकांमध्‍ये गीता लोकप्रिय 
- गीताने आपले शिक्षण भायखळ्यातील सेन्‍ट अंगेश हायस्‍कूलमधून पूर्ण केले आहे. 
- डॉनची मुलगी आणि सामान्यांशी जुडलेली नाळ यामुळे गीता आपल्‍या मतदारक्षेत्रात खूप लोकप्रिय आहे. 
- गरीबांच्‍या मदतीसाठी गीता नेहमी पुढे येत असते. राज्‍यात काद्ंयाचे भाव वाढल्‍यानंतर गीताने मोफत काद्ंयाचे वाटप केले होते. 
- दिवाळीमध्‍ये डॉन पित्‍याची इच्‍छा पूर्ण करण्‍यासाठी गीताने 5 रुपये किलो या प्रमाणे साखरेचे वाटप केले होते. 
 
सर्वात गरीब उमेदवार
- 2014मधील महाराष्‍ट्र विधानसभाच्‍या निवडणुकीसाठी गीताने 'अखिल भारतीय सेना' तर्फे निवडणुक लढविली होती. 
- उमेदवारी अर्ज दाखल करताना गीताने आपली संपत्‍ती 1.29 कोटी रुपये इतकी सांगितली होती. याअनुसार गीता गरीब उमेदवारांच्‍या यादीत दुसऱ्या स्‍थानावर होती. 
 
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, गीता गवळीचे अरुण गवळी आणि भावासोबतचे फोटोज... 
 
बातम्या आणखी आहेत...