आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Underworld, Don, Dawood Abrahim, Haji Mastan, Chota Rajan, Chota Shakeel, Mumbai

एका डॉनच्या खात्म्यानंतर सुरू झाला \'डॅडी\'चा आतंक !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मायानगरी मुंबईत अनेक माफिया आणि डॉन निर्माण झाले आणि लयाला गेले आहेत. येथील अनेक माफियांपुढे पोलिसांचेही काही चालत नाही. या मायानगरीने हाजी मस्तानपासून आबू सालेमपर्यंत अनेकांना रस्तावरून उचलून मुंबईचा बेताज बादशाह बनवले आहे. इथे आम्ही अशाच काही डॉनच्या आयुष्यातील किस्से सांगणार आहोत.

एकेकाळचा डॉन डॅडी अर्थात अरुण गवळीचा निर्णय अखेर लागला आहे. शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या खूनाच्या आरोपात गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. मुंबईच्या दगडी चाळीत राहाणा-या या डॉनला पहिल्यांदाच अटक झाली आणि शिक्षाही सुनावली गेली आहे. जिथे या डॉनच्या इशा-याशिवाय एक पानही हलत नव्हते, आता तोच या आरोपांशी माझा काही संबंध नाही, मी निर्दोष आहे अशी बतावणी करत आहे.

मार्च 2008 मध्ये अरुण गवळीच्या इशा-यावर शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांचा खून करण्यात आला होता. गवळीने 30 लाखांत या हत्येची सुपारी घेतली होती. मुंबई पोलिसांनी या आरोपात गवळीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. जेव्हा जामसांडेकर यांची हत्या करण्यात आली तेव्हा हा डॉन विधानसभेत आमदार होता आणि आता काळकोठडीत आहे.

1960-70 च्या दशकात माफियांचा मुख्य धंदा हा तस्करीचा होता. परदेशातील सोने आणि कपडे यावर बंदी असल्याने या वस्तू तस्करीच्या माध्यमातून भारतात आणल्या जात होत्या. एकेकाळी वरदराजन मुदलियार, करीम लाला, हाजी मस्तान, दाऊद इब्राहिम, अमर नाईक, अश्विन नाईक, राजन, छोटा राजन, छोटा शकील, अबू सालेम या या गँगस्टर्सनी मुंबईतील आपापले भाग वाटून घेतले होते. यांना राजकीय नेत्यांचाही आश्रय मिळत होता. त्याचबरोबर मुंबईतील बिल्डर विरोधकांवर मात करण्यासाठी यांचा वापर करून घेत होते. यासाठी बिल्डर लॉबीकडून यांना मोठ्या रकमा दिल्या जात होत्या.