मुंबई - रिअल इस्टेट एजंटला खंडणी मागितल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन
दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी इक्बालसह त्याच्या एका साथीदाराला जे. जे. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
इक्बालच्या नावाखाली त्याच्या साथीदारांनी
आपल्याला तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार सलीम शेख यांनी पोलिसांत दिली होती. इक्बालला यापूर्वीही अटक झाली होती. तो सारा-सहारा प्रकरणातील आरोपी आहे. २००३ मध्ये त्याला दुबईतून भारतात पाठवण्यात आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मोक्का कायद्याखाली अटक केली होती.