आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवुड अभिनेत्रीपासून पाकिस्तानी गर्लसुद्धा राहिल्या आहेत दाऊदच्या गर्लफ्रेंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाऊद इब्राहिम आणि अनिता अयुब (फाईल फोटो) - Divya Marathi
दाऊद इब्राहिम आणि अनिता अयुब (फाईल फोटो)
मुंबई- 14 वर्षानंतर पुन्हा एकदा मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या 12 मालमत्तांचा लिलाव होणार आहे. हा लिलाव बुधवारी ( 9 डिसेंबर) होत आहे. दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावाची बोली 1 कोटी 18 लाखापासून पुढे लावली जाणार आहे. याबाबत सांगितले जाते की, दाऊदची संपत्ती केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानसह इतर काही देशांतही आहे. दाऊद खूपच मिजासखोर मानलो जातो. त्याच्या अनेक गर्लफ्रेंड राहिल्या आहेत. आज आम्ही त्याच्या आयुष्यात आलेल्या महिलांची नावे सांगणार आहोत. डॉन सध्या फरार आहे व पाकिस्तानात असल्याचा संशय आहे. त्याच्यावर 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांसह अनेक खटले, गुन्हे दाखल आहेत.
अनिता अयूब
ही पाकिस्‍तानी अभिनेत्री आहे. काही काळच ती फिल्म इंडस्ट्रीत राहिली. पाकिस्‍तानी अभिनेत्रीपैकी ती एकमेव अशी होत जी की दाऊदची गर्लफ्रेंड होती. बॉलीवुडचे चित्रपट निर्माण जावेद सिद्दिकी यांनी तिला आपल्‍या चित्रपटात घेण्‍यास नकार दिला ते गँगस्‍टरकडून त्‍यांची गोळी मारून हत्‍या करण्‍यात आली. त्‍यामुळे अनीता चर्चेत आली होती. तिने दिलेल्‍या काही बोल्ड सीनमुळेही ती वादग्रस्‍त ठरली होती. अनीताने 'गँगस्टर' (1995), 'प्यार का तराना' (1993) आणि 'सब के बाप' यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अनितासाठी दाऊदने केली होती प्रॉड्यूसरची हत्या-
पाकिस्तानी कलाकार अनीता आयुबचा बॉलिवूडशी फार थोडाकाळ संबंध आला. असे म्हटले जाते, की अनीता ही एकमेव पाकिस्तानी अभिनेत्री आहे जी दाऊदची गर्लफ्रेंड होती. अनीताला चित्रपटात साइन करण्यास बॉलिवूड प्रॉड्यूसर जावेद सिद्दीकी यांनी नकार दिला होता. त्यानंतर दाऊदच्या शुटरने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
मंदाकिनी
1985 मध्ये 'राम तेरी गंगा मैली' चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री मंदाकिनीचे नाव 1994 मध्ये दाऊदसोबत जोडले गेले. 1996 मध्ये 'जोरदार' या चित्रपटाने तिने बॉलिवूड संन्यास घेतला. मंदाकिनी आणि दाऊदला शारजाच्या मैदानावर एकत्र क्रिकेट पाहाताना जगाने पाहिले होते. दाऊदने तिच्याशी लग्न केल्याची चर्चा होती. मात्र, दाऊद पाकिस्तानात पळून गेला. आता मंदाकिनी दलाई लामा यांची भक्त आहे.
बंगळुरुमध्ये राहतो दाऊदचा मुलगा-
दिल्लीचे माजी पोलिस आयुख्त नीरज कुमार यांनी नुकताच आपल्या पुस्तकात दावा केला आहे की, दाऊदने एका बॉलिवुड अभिनेत्रीसोबत लग्न केले आहे. तिला दाऊदपासून एक मुलगाही आहे. नीरजकुमार यांनी हा ही दावा केला होता की, तो मुलगा आता बंगळुरुमध्ये राहतो. तसेच त्याची जबाबदारी संबंधित अभिनेत्रीच्या बहिणीकडे आहे. मात्र, ती अभिनेत्री कोण याबाबत नीरजकुमार यांनी खुलासा केलेला नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अंडरवर्ल्ड डॉनच्‍या गर्लफ्रेंडस....
बातम्या आणखी आहेत...