Home | Maharashtra | Mumbai | Underworld don Dawood Ibrahims properties to be auctioned today in Mumbai

दाऊद इब्राहिमच्या 3 मालमत्तांची 11.58 कोटींत विक्री, 17 वर्षांत पाचवा लिलाव

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Nov 15, 2017, 01:01 AM IST

मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आणि सध्या पाकिस्तानात असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या जप्त करण्यात आलेल्या

 • Underworld don Dawood Ibrahims properties to be auctioned today in Mumbai
  मुंबई- मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आणि सध्या पाकिस्तानात असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा गेल्या १७ वर्षांत पाचव्यांदा लिलाव झाला. हॉटेल रौनक अफरोज, डांबरवाला बिल्डिंगच्या ६ खोल्या आणि शबनम गेस्ट हाऊस या तीन मालमत्ता मंगळवारी सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने ११.४८ कोटी रुपयांना लिलावात बोली लावून विकत घेतल्या. तिन्ही मालमत्ता भेंडी बाजार परिसरातच आहेत. याचे बाजार मूल्य ५० कोटी रुपये आहे. डिसेंबर २०१५ मध्ये दाऊदची कार खरेदी करून जाळून टाकणारे हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराजही या लिलावात सहभागी होते. मात्र, सर्वाधिक बोली ते लावू शकले नाहीत. १९९० मध्ये दाऊदने भारतातून पलायन केल्यानंतर राज्य सरकारने त्याच्या १० मालमत्ता जप्त केल्या होत्या.
  हॉटेल रोनक अफरोज
  आधारभूत किमतीच्या चौपट अधिक भाव मिळाला लिलावात आरक्षित किंमत १.१८ कोटी होती. विक्री मात्र ४.५३ कोटीत झाली. ४८५ चौरस फूट या मालमत्तेचे नाव ‘दिल्ली जायका’ असे आहे. पत्रकार बालाकृष्णन यांनी डिसेंबर २०१५ मध्ये बोली लावत ४.२८ कोटींत याची खरेदी केली होती. मात्र, बोलीनंतर ते पैसे भरू शकले नाहीत म्हणून पुन्हा एकदा लिलाव झाला.
  ‘डांबरवाला’त ६ खोल्या
  या इमारतीस दुपटीहून अधिक किंमत
  ३.५३ कोटीत लिलाव. आरक्षित िकंमत १.५६ कोटी होती. पूर्वी दाऊद आणि नंतर त्यांचा भाऊ इक्बालचे कुटुंब राहत होते.
  शबनम गेस्ट हाऊस
  पावणेतीन पट अधिक दराने झाला लिलाव ३.५२ कोटीत लिलाव. आरक्षित किंमत १.२१ कोटी. ही दुमजली इमारत मोडकळीस आल्याचे घोषित करण्यात आले आहे.
  याच मालमत्तेमुळे थांबला होता भेंडी बाजारचा विकास
  भेंडी बाजारचा पूर्ण पंरिसर १६.५ एकरांत पसरला आहे. येथे सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या वतीने पुनर्निर्माणाचे काम सुरू आहे. जवळपास ४,२०० कोटींचा हा प्रकल्प आहे. दाऊदच्या भीतीने त्याच्या मालमत्तेला कोणी विकत घेत नव्हते. त्यामुळेच परिसरात विकासही थांबला होता. पूर्वीच्या मालमत्ता पाडून येथे बहुमजली इमारत बनवण्यात येणार आहे.
  २००१ नंतर अजूनही घेतला नाही ताबा
  २००० मध्ये दाऊदच्या मालमत्तांचा पहिला लिलाव झाला तेव्हा कुणीच पुढे आले नाही. २००१ मध्ये वकील अजय श्रीवास्तव यांनी २ दुकाने खरेदी केली. याच वर्षी लिलावात पीयूष जैन यांनी एक मालमत्ता खरेदी केली. जैन यांना धमक्या येऊ लागल्याने त्यांनी ताबा घेतलाच नाही. तर, श्रीवास्तव यांचे प्रकरण कोर्टात आहे.

  पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... दाऊदच्या कोणत्या मालमत्तांचा झाला लिलाव...
 • Underworld don Dawood Ibrahims properties to be auctioned today in Mumbai
  होटल रौनक अफरोज, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई
   
  – हॉटेल रौनक अफरोज, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई
  खरेदी किंमत: 4 कोटी 52 लाख 53 हजार रुपये

  लिलावाची सुरुवातीची किंमत: 1 कोटी 18 लाख 63 हजार
   
 • Underworld don Dawood Ibrahims properties to be auctioned today in Mumbai
  शबनम गेस्ट हाऊस, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई
  – शबनम गेस्ट हाऊस, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई
  खरेदी किंमत : 3 कोटी 52 लाख रुपये

  लिलावाची सुरुवातीची किंमत : 1 कोटी 21 लाख 43 हजार
 • Underworld don Dawood Ibrahims properties to be auctioned today in Mumbai
  डांबरवाला बिल्डिंग, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई
  – डांबरवाला बिल्डिंग, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई
  खरेदी किंमत: 3 कोटी 54 लाख रुपये
  लिलावाची सुरुवातीची किंमत: 1 कोटी 55 लाख 76 हजार


  पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... दाऊदची कार दहशतवादाचे प्रतीक असल्याचे सांगत जाळून टाकली...
 • Underworld don Dawood Ibrahims properties to be auctioned today in Mumbai
  दाऊदचे हॉटेल तोडून शौचालय बनवणार
  दरम्यान, दाऊदच्या मालकीचे रोनक अफरोज हॉटेल विकत घेऊन त्या ठिकाणी निशुल्क शौचालय बांधण्याचा निर्धार हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी केला होता. परंतु या लिलावात त्यांना यश मिळाले नाही.
   
 • Underworld don Dawood Ibrahims properties to be auctioned today in Mumbai
  मागील लिलावात दाऊदची हिरव्या रंगाची कार स्वामी चक्रपाणी यांनी  32,000 रुपयांत खरेदी केली होती. यानंतर ही कार दहशतवादाचे प्रतीक असल्याचे सांगत गाझियाबादमध्ये ती पेटवून दिली होती.

Trending