आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदच्या काळ्या कृत्याला वैतागून मशिदीत राहतोय त्याचा एकुलता एक मुलगा, भेटा फॅमिलीला...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाऊदचा एकुलता एक मुलगा मोईन... - Divya Marathi
दाऊदचा एकुलता एक मुलगा मोईन...

मुंबई- दाऊद इब्राहिम सध्या डिप्रेशनमध्ये असल्याचे वृत्त आहे. याचे कारण आहे त्याचा एकुलता एक मुलगा फॅमिली बिजनेस सोडून मौलवी बनला आहे. दाऊदचे तिसरे संतान असलेला 31 वर्षाचा मोईन नवाज डी कासकर त्याचा एकुलता एक मुलगा आहे. ठाण्यातील अॅंटी एक्सटॉर्शन (खंडणीविरोधी) पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, "मोईन आपल्या वडिलांच्या काळ्या कृत्याच्या विरोधात गेला आहे. याचे कारण त्यांची संपूर्ण फॅमिली जगभर कुख्यात झाली आहे." मशिदीत राहतोय मोईन...

 

- प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, दाऊदचा छोटा भाऊ इक्बाल कासकरने चौकशीदरम्यान हे सांगितले की, कुटुंबात शांती-समाधान नसल्यामुळे मोईन त्रस्त आहे. तो कराचीतील दाऊदचा बंगला सोडून मशिदीत राहायला गेला आहे. 
- इक्बालने पोलिसांना सांगितले की, त्याचा पुतण्या मोईन एक मौलवी बनला आहे. तो कराचीतील पॉश क्लिफ्टन भागातील फॅमिलीचा बंगला सोडून तेथे जवळच बनलेल्या मशिदीत राहत आहे. त्याची पत्नी सानिया आणि तीन मुले सुद्धा मशिदीत मिळालेल्या छोट्या घरात राहत आहे.
- इक्बालने चौकशीदरम्यान सांगितले की, मोईन कराचीतील एक इज्जतदार मौलवी बनला आहे. लोक त्याचा सन्मान करतात. तो तेथील मुलांना कुरान व इतर धार्मिक बाबीचे ज्ञान देतो. असे नाही की, मोईन पित्यामुळे मौलवी बनला आहे तर त्याचे कुरान पाठ आहे. त्यामुळे तो मौलवी बनला आहे.

 

इक्बालने केले हे 6 खुलासे-

 

इक्बालला ठाणे पोलिसांनी सप्टेंबर महिन्यात खंडणी वसूलीत अटक केली आहे. तेव्हापासून इक्बाल अनेक खुलासे करत आहे. आतापर्यंत त्याने केले खुलासे.....

1) इक्बालने दाऊदला दारू सोडण्याचा सल्ला दिला आहे. 
2) दाऊद भारतातील आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधत नाही, फोन करत नाही.
3) कराचीत राहतो दाऊद.
4) दाऊद वेगवेगळी ठिकाने बदलत राहतो.
5) वसूली धंद्यात दाऊदचा कोणताही रोल नाही.
6) 2016 मध्ये इक्बालचे संपूर्ण परिवार दाऊदची पत्नी मेहजबीनला दुबईत भेटला होता.

 

दाऊदची पत्नी आणि मुले-

 

- दाऊदच्या पत्नीचे नाव महजबीन ऊर्फ जुबीना झरीना आहे. दाऊदला चार मुले आहेत. ज्यात एक मुलगा आणि तीन मुली आहेत. दाऊदच्या सर्वात धाकट्या मुलीचा मृत्यू झालेला आहे.
- दाऊदचा मुलगा मोईन इब्राहिम, मोठ्या मुलीचे नाव माहरुख आणि छोट्या मुलीचे नाव माहरीन आहे. दाऊदची मोठी मुलगी माहरुखचे लग्न पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जावेद मियांदादचा मुलगा जुनैदसोबत झाले आहे. 

 

दाऊद इब्राहिमचे भाऊ अनीस आणि इक्बाल-

 

- भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, 26 डिसेंबर 1955 रोजी मुंबईतील रत्नागिरी भागात दाऊदचा जन्म झाला.  
- दाऊद इब्राहिमचे वडिल एक पोलिस कॉन्स्टेबल होते. दाऊद गुन्हेगारी व वसूलीचे इंटरनॅशनल नेटवर्क म्हणजेच 'डी कंपनी' चालवतो. दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम त्याची डी कंपनी चालविण्यास मदत करतो. 
- दाऊदचा एक भाऊ इक्बाल कासकर मुंबईत आपली पत्नी आणि तीन मुलांसह राहतो. त्याच्यावर 2011 मध्ये जीवघेणा हल्ला झाला होता.

 

पुढे स्लाईड्सद्वारे भेटा, दाऊदच्या संपूर्ण फॅमिलीला.....

बातम्या आणखी आहेत...