आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Underworld Don Dawood Inbrahim Daughter And Property

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाऊदच्या कन्येच्या नावावर कोट्यवधींची प्रॉपर्टी, जावई सांभळतो बिझनेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाऊदची कन्या माहरुख आणि जावई जुनैद - Divya Marathi
दाऊदची कन्या माहरुख आणि जावई जुनैद
मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या प्रॉपर्टीवर यूएई सरकारने टाच आणली आहे. दाऊदची जप्त‍ करण्याचे काम सुरु केले आहे. यासंदर्भात भारत सरकारमधील अधिकाऱ्यांनी माहिती देण्यात आली आहे.

युएईमध्ये दाऊदची पाच हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. यातील काही प्रॉपर्टी दाऊदने कन्या माहरुख आणि जावई जुनैदच्या नावावर केली आहे. माहरुख हिचा विवाह पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादचा मुलगा जुनैद मियादांदसोबत झाला आहे.

आफ्रिका व दुबईत आहे दाऊदची प्रॉपर्टी
एका मीडिया रिपोर्टनुसार, डॉझियरमध्ये दाऊदच्या नावावर 'अल नूर डायमंड्स', 'ओएसिस पॉवर एलसीसी' असे दोन फर्म आहेत. याशिवाय डॉलफिन कन्स्ट्रक्शन, ईस्ट-वेस्ट एअरलाइन्स, किंग व्हिडिओ व मोईन गारमेंट्स नामक कंपन्यांचा मालकी हक्क दाऊदकडेच आहे. यापैकी बहुतांश कंपन्या त्याने मुलगी माहरुख आणि तिच्या पतीच्या नावावर केल्या आहेत.

डी कंपनीचे लोक सांभाळतात बिझनेस
दाऊदचा संपूर्ण बिझनेस त्याची कन्या आणि जावईच्या नावावर असला तरी डी कंपनीचे लोक हा बिझनेस सांभाळतात. डॉझियरमध्ये फिरोज नामक व्यक्ती ओएसिस ऑइल व लूब एलसीसी आणि अल नूर डायमंड्सचे काम पाहातो.

पुढील स्लाइडवर वाचा, दाऊदच्या फॅमिलीचे निवडक फोटो...