आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Underworld Don Haji Mastan Ralated Story In Marathi

हा आहे मुंबई अंडरवर्ल्डचा सर्वांत पहिला डॉन, दाऊदही करायचा याच्‍यासाठी काम!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईरवर राज करणा-यांची संख्‍या काही कमी नाही. परंतु त्‍याच्‍यामधील एक नाव असे आहे की, त्‍याचे नाव अदबीने घेतले जाते. मुंबई अंडरवर्ल्डचा सर्वांत पहिला डॉन आहे तो म्‍हणजे हाजी मस्‍तान.
अंडरवर्ल्‍ड आणि बॉलिवूड यांचे फार जुने नाते आहे. आजही अंडरवर्ल्‍डवर बॉलिवूडूधील भरपूर चित्रपट निघत आहेत. 29 ऑगस्‍ट ला दाऊद इब्राहिमवर आधारित चित्रपट द गॅंग्‍स ऑफ मुंबई प्रदर्शित होतोय. दाऊद ज्‍याच्‍यासाठी काम करायचा अशा हाजी मस्‍तान विषयी आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत.
गरीब घरामध्‍ये झाला जन्‍म
मस्‍तान हैदर उर्फ हाजी मस्‍तानचा जन्‍म 1 मार्च 1926 मध्‍ये तामिळनाडूच्‍या कुड्डालोर जवळील पनईकुल्‍लम गावामध्‍ये झाला. मस्‍तानचे वडील हैदर मिर्झा अत्‍यंत गरीब शेतकरी होते. गरीबीमुळे त्‍यांनी 1934 मध्‍ये मुंबईची वाट धरली. हैदर कफरोडमध्‍ये सायकल दुरस्‍तीचे छोटे दुकान चालवत होते.
1956 मध्‍ये मस्‍तानने केला स्‍मगलिंगच्‍या धंद्यात प्रवेश
हाजी मस्‍तानने सुकुर नारायण बखियासोबत 1956 मध्‍ये स्‍मगलिंगच्‍या धंद्यात प्रवेश केला. दोघांनी आपले भाग वाटूनही घेतले होते. मस्‍तान मुंबई पोर्टला सांभाळत होता. स्‍मगलिंगमध्‍ये त्‍याने खुप पैसा मिळविला. पांढरे शुभ्र कपडे, पांढरी मर्सिडीज बेंझ कार ही मस्‍तानची खास ओळख होती.
सिगारचा शौकीन
हाजी मस्‍तान सिगारचा शौकीन होता आणि तो नेहमी विदेशी सिगार घेत असे. हाजी मस्‍तानच्‍या बाबतीत असे म्‍हटल्‍या जाते की, त्‍याने हयातीत कधी स्‍वत: कुणावर गोळी झाडली नाही.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कधी झाला होता कारावास