आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊद, छोटा शकील, अरुण गवळीची मुलं- मुली काय करतात, जाणून घ्‍या आताच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेश आणि कृतिका - Divya Marathi
महेश आणि कृतिका
मुंबई - मायानगरी मुंबई म्‍हटले की, प्रत्‍येकाच्‍या समोर उभे राहते ते अंडरवर्ल्‍डचेच चित्र. एकेकाळी मुंबईत दहशत असलेले अनेक डॉन फरार झाले तर काहींचे एन्‍कांटर झाले. काही जण कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मात्र, या डॉनचे मुलं-मुली त्‍यांच्‍याच व्‍यवसायात आहेत असे नाही तर कुणी, व्‍यावसायिक, कुणी राजकारणी, कुणी डॉक्‍टर म्‍हणून सन्‍मानाने आयुष्‍य जगत आहेत. काही निवडक अंडरवर्ल्‍डच्‍या डॉनच्‍या मुलांविषयी ही खास माहिती केवळ divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
महेश अरुण गवळी
हा अरुण गवळीचा मुलगा असून, तो रिअल इस्टेटच्‍या व्‍यवसायात आहे. 9 मे 2015 रोजी कृतिका हिच्‍यासोबत लग्‍न झाले. 28 वर्षीय महेश आणि कृतिका यांना एकमेंकाना पाहताच प्रेम झाले होते. दोघांच्या घरच्यानी महेशचे पिता आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला भेटून हे लग्न निश्चित केले.
जेलमध्‍ये झाली लग्‍नाची बैठक
विशेष म्हणजे या लग्नाची बैठक कुठे घरी, रेस्टोरंट अथवा हॉटेलमध्ये नाही तर हे लग्‍न जेलमधील चार भिंतीच्या आड ठरवले गेले. शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या केल्याप्रकरणी अरुण गवळी सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, डॉनच्‍या इतर मुला-मुलींविषयी....