आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सध्या काय करत आहेत दाऊद, छोटा शकील, अरुण गवळीची मुले-मुली, जाणून घ्‍या एका क्लिकवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मायानगरी अर्थात मुंबई म्‍हटले की, आपल्या समोर उभे राहते अंडरवर्ल्‍डचेच चित्र. मायानगरीत कॅप्टन नावाने फेमस असलेला अबु सालेम याला कोर्टाने जन्मठेप सुनावली आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात टाडा कोर्टाने त्याला ही शिक्षा सुनावली आहे. दुसरीकडे, मुंबईतील दगडी जाळमध्ये राहाणार अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी सध्या तुरुंगात आहे. त्याच्या जीवनावर आधारित 'डॅडी' हा सिनेमा रिलीज झाला आहे. अभिनेता अर्जुन रामपाल याने या सिनेमा मुख्य अभिनय केला आहे.

दाऊद इब्राहिम फरार आहे. तो दुबई किंवा पाकिस्तानात असण्याची शक्यता आहे. मात्र, तुम्हाला माहीत आहे काय? या डॉन मंडळींचे मुले-मुली सध्या काय करताय? आज आम्ही आपल्यासाठी निवडक अंडरवर्ल्‍डच्‍या डॉनच्‍या मुलांविषयी खास माहिती घेऊन आलो आहे. काही मुले डॉक्टर म्‍हणून सन्‍मानाने आयुष्‍य जगत आहेत.

महेश अरुण गवळी
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचा हा मुलगा आहे. त्याचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे. त्याने कृतिकासोबत लग्‍न केले आहे. 28 वर्षीय महेश आणि कृतिका यांना एकमेंकाना पाहताच प्रेम झाले होते. कृतिकाच्या आई-वडिलांनी अरुण गवळीची जेलमध्ये भेट घेऊन दोघांचे लग्न ठरवले होते.

जेलमध्‍ये झाली लग्‍नाची बैठक
- कृतिका आणि महेशच्या लग्‍नाची जेलच्या चार भिंतीच्या आत झाली. 
- शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या केल्याप्रकरणी अरुण गवळी सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, डॉनच्‍या इतर मुला-मुलींविषयी....
बातम्या आणखी आहेत...