आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युनिनॉर मोबाईल कंपनीची मुंबईतील सेवा बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एक मिनीट जरी मोबाईल बंद पडला तरीही मोबाईलधारक बेचैन होतात. तर, युनिनॉर मोबाईल कंपनीची मुंबईतील सेवाच बंद झाल्यामुळे त्यांचे ग्राहक हवालदिल झाले आहेत.
टूजी घोटाळ्यानंतर युनिनॉरसह अनेक कंपन्याचे टूजी परवाने रद्द करण्यात आले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार युनिनॉरने सेवा बंद केली आहे.

कंपनीनं सेवा बंद केल्याचे मॅसेजेस युनिनॉरधारक ग्राहकांना पाठवले असल्याचा दावा केला आहे मात्र, ग्राहक कंपनीने कोणतीही पूर्वसुचना न देता सेवा बंद केल्याचे सांगत आहेत. कंपनीने सुचना दिली असती तर वेळीच पोर्टेबिलीटी करुन घेतले असते असे त्यांचे म्हणणे आहे.
मुंबईतील युनिनॉरच्या अठरा लाख ग्राहकांना या निर्णयाचा फटका बसलाय.