आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union FM Arun Jaitley Says New Crop Insurance Policy

नवीन पीक विमा अाणू - अरुण जेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदाच्या अनुकूल पावसामुळे शेती उत्पादनात वाढ हाेण्याची शक्यता असून स्मार्ट शहरांच्या उभारणीवर हाेणारा खर्च, वस्तू आणि सेवाकराची अंमलबजावणी आणि सध्या सुरू असलेल्या अार्थिक सुधारणांमुळे अाठ टक्के विकासदराचे लक्ष्य गाठता येईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी व्यक्त केला. नवी पीक याेजना अाणण्याचाही सरकारचा विचार असल्याचे ते म्हणाले.

नाबार्डच्या "शेतीविषयक समस्यांचे निराकरण आणि कृषी उत्पन्न वृद्धी” या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. सध्याची पीक विमा याेजना शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जापुरतीच मर्यादित अाहे. पण शेतकऱ्यांसाठी एक सर्वसमावेशक विमा याेजना अाणण्याचा केंद्र सरकार िवचार करत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

देशात चांगला पाऊस झाल्यास अन्नधान्याची महागाई िनयंत्रणात राहण्यास मदत हाेईल. कृषी खात्यानेदेखील देशाच्या बहुतांश भागात चांगला पाऊस पडत असल्याचे म्हटले असून सध्याचा िकंमतवाढीचा ताण कमी करण्यासाठी तेलबिया आणि डाळींचे उत्पादन वाढण्यासाठी ते महत्त्वाचे अाहे. कृषी क्षेत्राला कमी सिंचन पातळी, जादा कर्ज, सक्षम विमा यंत्रणेचा अभाव तसेच हवामान बदल यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत अाहे. मात्र तरीही भारतीय शेतकऱ्यांनी अन्नधान्यामध्ये स्वावलंबन मिळवले असल्याचे जेटली म्हणाले.