आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना पृथ्वी थिएटरमध्ये झालेल्या सोहळ्याच चित्रपटसृष्टीतील सर्वात मानाचा असा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शशी कपूर दिल्लीतील सोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे मुंबईत शशी कपूर यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी या खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या पुरस्काराने सन्मानित होणारे शशी कपूर हे कपूर कुटुंबातील तिसरे सदस्य आहेत. बाल कलाकारापासून अभिनय क्षेत्राला सुरुवात केलेल्या शशी कपूर यांचा ओढा होता तो थिएटरकडे. त्यांनी एकापेक्षा एक सरस अशा चित्रपटांबरोबरच उत्कृष्ट नाटकांचीही निर्मितीत केली. पृथ्वी थिएटरही त्यांनीच सुरू केले होते. त्याच पृथ्वी थिएटरमध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणे हाच त्यांचा मोठा सन्मान आहे. यावेळी बोलताना अरुण जेटली यांनी शशी कपूर यांचा चित्रपटसृष्टीतील योगदानाबाबत गौरव केला. आपण एका अत्यंत मोठ्या परंपरेचे प्रतिनिधी आहात. तुमच्या कुटुंबातील तिघांना आतापर्यंत हा पुरस्कार मिळाला आहे आणि ज्या प्रकारे तुमच्या कुटुंबातील टँलेंट समोर येत आहे हा अखेरचा पुरस्कार नक्कीच नसेल, असे जेटली यावेळी म्हणाले.

शशी कपूर यांचे मित्र आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनीही शशी कपूर यांच्या कारकिर्दीचा गौरव केला. यावेळी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सेलेब्रिटी...