आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार नेते शरद राव यांचे निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -जॉर्जफर्नांडिस यांच्यानंतर मुंबई हाकेसरशी बंद करण्याची ताकद असलेले ज्येष्ठ कामगार नेते, रिक्षा-टॅक्सीचालकांचे नेते शरद राव (७५) यांचे प्रदीर्घ अाजाराने गुरुवारी राहत्या घरी निधन झाले. त्यांची एक कन्या विदेशात असल्याने त्यांच्यावर सप्टेंबरला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शरद राव यंाची रिक्षा-टॅक्सी युनियन आणि महापालिकेतील कामगारांची संघटना या मुंबईतील सर्वात प्रभावी संघटना आहेत. रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीसंदर्भात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत असे. राव यांच्या प्रभावाखाली मुंबईतील कामगार मोठ्या प्रमाणात होते. रिक्षा, फेरीवाले, किरकोळ व्यापारी, कारागीर, छोटे व्यापारी, शेतमजूर, महापालिका-नगरपालिका कर्मचारी त्यांच्या एका शब्दावर आजही संप आणि आंदोलने करण्यास तयार होत होते. शरद राव यांची कारकीर्द हिंद किसान मजदूर सभेबरोबरच सुरू झाली. राव यांनी ‘बंदसम्राट’मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली काम केले.
बातम्या आणखी आहेत...