आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील शेतकरी अात्महत्या हे सर्वांचेच अपयश, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये मतभिन्नता असली तरी विविध पक्षांतील नेत्यांचा संवाद हा साैहार्दपूर्ण असताे. दिल्लीच्या राजकारणात मात्र असे चित्र अपवादानेच दिसते,’ असे मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
 
गडकरी शनिवारी (ता. २७ मे) वयाची ६० वर्षे पूर्ण करत अाहेत. या निमित्ताने त्यांनी विविध विषयांवर ‘दिव्य मराठी’शी दिलखुलास संवाद साधला. ‘माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि जॉर्ज फर्नांडिस हे माझे आयकॉन आहेत’, असेही त्यांनी सांगितले. ‘राज्यातील शेतकऱ्यांच्या अात्महत्या या चिंतेचा विषय अाहे. मात्र, त्यासाठी काेणताही एक पक्ष जबाबदार नाही. हे सगळ्यांचेच अपयश अाहे. हे राेखण्यासाठी नियाेजन करून किमान ५० टक्के जलसिंचन अाणि ६० टक्के ड्रिपचे जाळे पसरवणे गरजेचे अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे विशेष लक्ष घातले अाहे.’
 
‘सार्वजनिक जीवनात लोकप्रतिनिधींचे आचरण कसे असावे, याबाबत स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणात अादर्श परंपरा रुजवली अाहे. महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांनी ही परंपरा पाळली अाहे. यातून वैचारिक प्रगल्भता दिसून येते. याला काही किरकाेळ अपवाद अाहेत. दिल्लीत मात्र सूडबुद्धीचे राजकारण दिसते. मलाही त्याचा फटका बसला अाहे. राष्ट्रीय अध्यक्षपद साेडण्याची वेळ येणे हा अशाच राजकारणाचाच एक भाग हाेता.
 
मात्र, महाराष्ट्रातून अालेल्या राजकीय नेत्यांमध्ये जिद्द अाहे. त्यांनी वेळाेवेळी आपली कार्यक्षमता आणि गुणवत्ता सिद्ध केली अाहे. अशा नेत्यांना पुढे दिल्लीने स्वीकारले. जात, भाषा अथवा राज्य यापेक्षा इथल्या राजकारणात रुजायचे असेल तर सतत कार्यरत राहण्याची अाणि नवनवे प्रयोग करण्याची जिद्द हवी अाहे. नकारात्मक विचार मनातून काढून टाकले पाहिजेत. माझ्या मनात तरी कोणाबाबतही पूर्वग्रह नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जाण्याची लालसा मला कधीच नव्हती, अाता केंद्रातच मला राजकारण अाणि समाजकारण करायचे अाहे,’ असे स्पष्टीकरणही गडकरींनी दिले.
 
गडकरी म्हणाले,
- माेदी हे मंत्र्यांना कामच करू देत नाहीत, हा अपप्रचार हाेता. मंत्रिमंडळाने घेतलेले २२ निर्णय बदलायला मी भाग पाडले, त्यात माेदींचा अडथळा नव्हता. सरकारचे प्रमुख या नात्याने त्यांना काही निर्णय घ्यावे लागतात. मात्र, त्यामागची भूमिका आम्ही समजावून घेतो.
- काेणत्याही पदासाठी मी कधीच अाग्रही नव्हताे, पुढेही राहणार नाही. जी पदे माझ्या वाट्याला आली, ती आपणहून चालत आली.
- सध्या देशात रोज ३० कि.मी. अंतराचे महामार्ग बांधले जात अाहेत; ४० कि.मी.लक्ष्य अाहे.
- सागरमाला प्रकल्पात २५ लाख कोटींची आर्थिक गुंतवणूक आहे. यापैकी लाख कोटींची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत.
- देशातल्या १२ महत्त्वाच्या बंदरांची ४.८६ टक्के कार्यक्षमता गेल्या वर्षांत वाढली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...