आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Union Minister Of Energy Piyush Goyal, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीज प्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्‍याकडून घाणेरडे राजकारण - पियूष गोयल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दक्षिण आणि मध्य मुंबईतील वीज संकटाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे केंद्र सरकारवर ताशेरे ओढून घाणेरडे राजकारण करीत असल्याचा आरोप केंद्रीय उर्जा व कोळसा मंत्री पियूष गोयल यांनी केला.
गोयल यांनी आज भाजपच्या मुख्यालयात अनौपचारिक चर्चेत सांगितले की, कोळसा आणि वीज मंत्रालयाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी 17 राज्यांसोबत तेथील वीज उत्पादन स्थितीबाबत आढावा बैठकी घेतल्या. मात्र, वीज संकटाचा सामना करीत असलेल्या महाराष्‍ट्र आणि उत्तर प्रदेशसोबत मात्र एकही बैठक होऊ शकली नाही. राजस्थान, आंध्रप्रदेश आणि दिल्ली हे राज्य 24 बाय 7 वीज पुर्ततेसाठी सक्षम झालेले आहेत.
महाराष्‍ट्रात गणेश उत्सव जोरात सुरु आहे त्यामुळे विजेचा वापरही मोठ्या प्रमाणात होत असतो. दक्षिण आणि मध्य मुंबईच्या बहुतांश भागात मंगळवारी अंधार होता. ट्रॉँबेतील टाटा पॉवर संयत्र बंद पडल्याने अशी स्थिती उदभवली होती. कोळशाचा पुरवठा अनियमित होत असल्याचे कारण राज्यसरकार पुढे करीत आहे. परंतु एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये कोळशावर आधारीत वीज निमिर्तीमध्ये 15.8 टक्के वाढ झालेली आहे. कमी पाऊस पडूनही वीज निर्मितीवर परिणाम झालेला नसल्याची माहिती गोयल यांनी दिली. महाराष्‍ट्राला जेवढा कोळसा पाहिजे तेवढा देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्‍ट्र सरकार बैठकीला येत नाही यासारखे दुर्देव नसल्याची टीका त्यांनी केली.