आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवलेंची नवी कविता...\'कोई माने या ना माने, बीजेपी में जल्दी आयेंगे नारायण राणे\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- काँग्रेस नेते नारायण राणे तिकडे तळकोकणात जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत तर इकडे खासदार रामदास आठवले यांनीच राणे भाजपवासी होतील असे म्हटले आहे. 'कोई माने या ना माने, बीजेपी में जल्दी आयेंगे नारायण राणे' अशी यमक जुळवणारी कविता सादर करत आठवलेंनी राणेंबाबत भविष्य वर्तवले.
 
केंद्रात सामाजिक न्यायराज्यमंत्री असलेले आठवले आज शिर्डीत होते. नारायण राणेंनी आज कोकणात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पणजी विमानतळावरून ते चारचाकीच्या ताफ्यात रोड शो करत कुडाळ येथे पोहचले. याबाबत रामदास आठवले यांना छेडले असता राणे लवकरच भाजपात प्रवेश करतील असे सांगितले. हे सांगताना आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कविता सादर केली. 'कोई माने या ना माने, बीजेपी में जल्दी आयेंगे नारायण राणे' ही यमक जुळणारी कविता सादर केली. जर राणेंना भाजप घेत नसेल तर त्यांनी माझ्या पक्षात रिपाइंत यावे. कारण काँग्रेसला काहीही भविष्य नाही अशी ऑफर पुन्हा एकदा राणेंना दिली.
 
राणेंच्या प्रवेशास भाजप नेत्यांचा विरोध मावळला?- 
 
काँग्रेसमुक्त भारताची सुरूवात कोकणातूनच होईल, असे सांगत कोकणातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाचे स्पष्ट संकेत येथे बोलताना दिले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केव्हा होईल याची आपणास कल्पना नाही. मात्र, कोकणातूनच काँग्रेसमुक्त भारताची सुरूवात होईल, असे सांगितल्याने राणेंच्या प्रवेशाला भाजपमधील मंडळीचा विरोध संपल्याचे स्पष्ट झाले आहे. 
बातम्या आणखी आहेत...