आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unknown Person Tried To Press Throat Of Kanhaiyya Kumar

विमानात गळा दाबण्याचा प्रयत्न; कन्हैयाचा दावा खोटा : पोलिस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्हैय्या कुमार आणि त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती. (उजवीकडे) - Divya Marathi
कन्हैय्या कुमार आणि त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती. (उजवीकडे)
मुंबई- मुंबईहून पुण्याला जात असताना विमानतळावर विमानात एका सहप्रवाशाने आपला गळा दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमारने केला खरा, परंतु प्राथमिक चौकशीत या आरोपात तथ्य आढळले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मानस ज्योती नागेंद्र डेका (वय ३३) या सहप्रवाशाने कन्हैयाचा आरोप धादांत खोटा असल्याचे सांगून प्रसिद्धीसाठी हा स्टंट असल्याचे म्हटले आहे. विमानात खिडकीजवळ बसलेला मानस पाय अवघडल्यामुळे उठत असताना त्याचा तोल गेला त्याचा हात कन्हैयाच्या मानेला लागला. यावरून दोघांत जुंपली. गोंधळ पाहून अधिकाऱ्यांनी दोघांनाही खाली उतरवले. दरम्यान, कन्हैयाने याबाबत टि्वट केले. यावर पोलिस सतर्क झाले. मग चौकशी सुरू झाली. मात्र, हा प्रकार खोटा असल्याचे स्पष्ट झाले. मुंबईचे सहआयुक्त देवेन भारती यांच्यानुसार, कन्हैयाने तक्रार दाखल करण्यास नकार दिला.
कन्हैय्याच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत आधीपासूनच चांगलेच वाद सुरू आहेत. कन्हैय्याने देशविरोधी वक्तव्य केल्यास त्याला धडा शिकवण्याचा इशारा काही संघटनांनी दिल आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याच्या कार्यक्रमाचे स्थळही बदलण्यात आले. कन्हैय्याकुमार त्याच्या भाषणामध्ये प्रामुख्याने मोदी आणि मोदी सरकारवर हल्ला चढवत आहेत. त्यामुळे त्याच्याबाबत अनेकांमध्ये रोषाची भावना आहे. त्यातच मुंबईहून पुण्याला येताना विमानात एका अज्ञात व्यक्तीने त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
विमानात कन्हैय्यावर हल्ला झाल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी आणि इतर प्रवाशांनी त्याला सोडवले. त्यानंतर विमानाचे उड्डाण थांबवण्यात आले. 10 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर सुमारे 11 वाजेपर्यंत विमानाने पुण्याकडे उड्डाण घेतले नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान गळा दाबणारा व्यक्ती कोण होता, याबाबत माहिती समोर आलेली नसून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतरच विमान उड्डाण घेणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मुंबईतील कार्यक्रमातील कन्हैय्याचे PHOTOS