मुंबई- शिवसेनेच्या स्थापनेला येत्या रविवारी (19 जून) 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण हा उद्देश समोर ठेवून आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली होती. त्यांच्या पश्चात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. या निमित्ताने आम्ही आपल्यासाठी बाळासाहेबांची काही दुर्मिळ व अनसीन फोटोज घेऊन आलो आहोत.
बाळासाहेबांचे कुटुंब...
तीन मुले. बिंदुमाधव ठाकरे, जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे. पुतण्या राज ठाकरे. उद्धव आणि राज हे मावसभाऊदेखील आहेत. युवा सेनेचे प्रमुख आदित्य उद्धव ठाकरे नातू. 20 एप्रिल 1996 रोजी बाळासाहेबांचे थोरले चिरंजीव बिंदुमाधव यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर सहा महिन्यांनी बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई (सरला) यांचेही निधन झाले. उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे कार्यकारी प्रमुखपद आहे. वैचारिक मतभेदांमुळे जयदेव 1995 मध्ये कुटुंबापासून वेगळे झाले होते; परंतु बाळासाहेबांची प्रकृती बिघडल्यानंतर एक-दोन वेळा ते घरी आले होते.
राजकीय ओळख...
केशव सीताराम ठाकरे उपाख्य प्रबोधनकार ठाकरे हे बाळासाहेबांचे वडील. 1950 मध्ये बाळासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत उडी घेतली. राज्याला मराठी राज्य घोषित करण्याचाच उद्देश यामागे होता.
व्यंगचित्रकाराची कारकीर्द...
50 च्या दशकात बाळासाहेबांनी मुंबईतील फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून नोकरी पत्करली. नंतर त्यांची व्यंगचित्रे मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीत छापली जात होती. 1960 मध्ये त्यांनी ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र नियतकालिक सुरू केले. बिगरमराठी लोकांच्या वाढत्या प्रभावाचा मजकूर
यात होता.
मुस्लिम डॉक्टरांची देखरेख...
बाळासाहेबांवरील उपचारांची जबाबदारी दोन मुस्लिम डॉक्टरांच्या हाती होती. लीलावती रुग्णालयाचे डॉ. जलील पारकर आणि डॉ. अब्दुल समद अन्सारी मागील दशकभरापासून त्यांच्यावर उपचार करत होते. अखेरच्या क्षणीही या डॉक्टरांची सोबत होती. डॉ. पारकर यांच्या सांगण्यावरूनच यंदा बाळासाहेबांनी दसरा मेळाव्याच्या सभेला व्हिडिओच्या माध्यमातून संबोधित केले होते.
नातीचे मुस्लिमाशी लग्न...
बिंदुमाधव यांची कन्या नेहा हिने 4 डिसेंबर 2011 रोजी गुजराती मुस्लिम मन्नन याच्याशी लग्न केले. मन्नन राज ठाकरे यांच्या मित्राचे पुत्र आहेत.
शिवसेनेचे राजकारण...
19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. महाराष्ट्रीय लोकांना त्यांचा हक्क मिळवून देणे हे ध्येय ठरले. 1989 मध्ये पक्षाचे मुखपत्र ‘सामना’ची सुरुवात झाली.
1995 मध्ये पहिले सरकार...
शिवसेनेने 1995 मध्ये भाजपच्या जोडीने राज्यात सरकार स्थापन केले. 1999 पर्यंत सत्तेवर राहिलेल्या या सरकारचा प्रत्येक निर्णय बाळासाहेबांच्याच हाती होता, असे बोलले जाते. केंद्रातील रालोआ सरकारमध्येही शिवसेना सहभागी होती. मुंबई महापालिका मागील 17 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, बाळासाहेब ठाकरे यांचे निवडक दुर्मिळ फोटो... आपण कधीही बघितले नसेल असे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)