आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UNSEEN PICS: जिवाची मुंबई करायची आहे मग ही छायाचित्रे पाहाच...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईला 'सपनों का शहर' म्हटले जाते कारण मुंबईत लाखो लोक स्वप्न पाहतात व ते सत्यातही उतरवतात. या शहराची आपली एक वेगळी शान आहे व त्यासाठी ते जगभर प्रसिद्ध आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. 3 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असल्या कारणाने मुंबई देशातील सर्वात मोठे शहर ठरते. मुंबईची ओळख बॉलिवूडमुळे संपूर्ण जगभर आहे. मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हटले जाते.
'मुंबई' नाव दोन शब्दांनी मिळून बनले आहे. मुंबा या महा-अंबा (हिंदू देवी दुर्गाचे रूप) आणि आई हे दोन ते शब्द. मुंबईचे नाव पहिले बम्बई होते. हे नावम पोर्तूगीजच्या व्यापा-यांनी दिले होते.
मुंबईत अनेक महत्त्वाची कार्यालये व संस्था आहेत. त्यात भारतीय रिझर्व बॅंक, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज तसेच अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्पोरेट ऑफिसेस आहेत.
मुंबईची आणखी एक खास ओळख म्हणजे येथील नाईट लाइफ. नाईट लाइफबाबत या शहराला अमेरिकेतील लास वेगास म्हटले जाते. दिव्यमराठी.कॉम आपल्यासाठी अशी काही छायाचित्रे घेऊन आले आहे जी तुम्ही कदाचित पाहिली नसतील.
तर पुढे एक-एक पाहा स्वप्ननगरीतील स्वप्नवत छायाचित्रे...