आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीटग्रस्तांना आठ दिवसांत मिळणार मदत, कोरडवाहू: 6000, बागायत 13,500

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आधीच दुष्काळ त्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून रब्बी शेतीला याचा मोठा फटका बसला आहे. याची दखल घेऊन राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून ८ दिवसांच्या आत मदत देण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.
कोरडवाहूसाठी प्रतिहेक्टरी ६ हजार, बागायतीसाठी हेक्टरी १३, संत्री-मोसंबीकरिता १८ हजारांची मदत केली जाईल. दोन हेक्टरसाठी ही मदत मिळेल. वीज पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाखांची मदत देण्यात येणार आहे.

अवकाळीने गहू, हरभरा, कांदा, सूर्यफुल, संत्री, केळीचे नुकसान झाले आहे. औरंगाबाद, नांदेड, बीड, उस्मानाबादसह राज्यातील नुकसानग्रस्तांना लगेच मदत मिळेल. केंद्राच्या नव्या नियमान्वये ५०% ऐवजी ३३% नुकसान झाले तरी भरपाई मिळेल.

गाय व म्हैशीसाठी प्रत्येकी ३० हजार, तर बैलाकरिता २५ हजारांची मदत मिळेल. गाढव, रेडकूसाठी १५ हजार, शेती, मेंढीसाठी ३ हजार मिळेल. एका कुटुंबातील ५ जनावरांसाठी ही
मदत मिळणार आहे.
विशेष म्हणजे १३ मे २०१५ च्या सरकार निर्णयानुसार आता उंट, घोटा, याक या प्राण्यांच्या नुकसानीबद्दलही संबंधितांना मदत मिळेल.
नुकसानीचा नक्की आकडा नाही : खडसे
राज्यात अवकाळी पाऊस, वादळ व गारपीट ४ मार्चपर्यंत सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही िठकाणी नुकसानीचा आकडा समोर आला असला तरी आणखी िकती नुकसान झाले, याची नक्की मािहती समोर आलेली नाही. मात्र पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याची अशी मािहती राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी िदली.