आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इसिस’च्या अतिरेक्याला मुंबई विमानतळावर अटक; उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संशयित अबु झैद... - Divya Marathi
संशयित अबु झैद...
मुंबई- सौदी अरेबियाच्या रियाध येथून परतल्यानंतर इसिसशी संबंधित अबू अलाउद्दीन झैद या अतिरेक्याला यूपी एटीएस पथकाने शनिवारी रात्री मुंबई विमानतळावरून अटक केली. अाझमगड जिल्ह्यातल्या गंभीरपूरचा मूळ रहिवासी अबू झैद पश्चिम यूपीच्या तरूणांना इसिसकडे आकर्षित करण्याचे काम करत होता. 

उत्तर प्रदेश एटीएसचे प्रमुख असीम अरुण यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१७ मध्ये यूपी एटीएसने इसिसशी संबंधित उमर ऊर्फ नाझिम, गाझी बाबा ऊर्फ मुजम्मिल, मुफ्ती ऊर्फ फैजान व जकवान ऊर्फ एहतेशाम या ४ अतिरेक्यांना अटक केली होती. अबू झैद हा या चौघांच्या कायम संपर्कात होता. त्यांच्या चौकशीनंतर अबू झैदचे नाव समोर आले. 
 
सोशल मीडियाद्वारे संपर्कात
हे सर्व एका इंटरनेट अॅपद्वारे संपर्कात होते. प्रमुख शहरांत एक मोठा घातपात करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. झैद हा सौदीतून सोशल मीडियाद्वारे भारतातील तरुणांच्या संपर्कात होता. तरुणांना इसिसकडे आकर्षित करणे हा त्याचा उद्देश होता. स्थानिक कोर्टाकडून प्राप्त ट्रांझिट रिमांडवर झैद याला लखनऊला नेण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...