आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Up Mechanism To Prevent Disputes Additional Charges

शुल्कवाढीचेे वाद टाळण्यासाठी यंत्रणा उभारा : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वाढीव शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकणाऱ्या पुण्यातील माध्यमिक शाळेला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. वाढीव शुल्क भरण्यास नकार देणाऱ्या या विद्यार्थ्याला शाळेत परत घेण्याचे आदेश पिंपरी येथील ज्ञानगंगा इंटरनॅशनल या शाळेला दिले आहेत. त्याचबरोबर कोणतेही वाढीव शुल्क मुलाच्या पालकांकडून घेऊ नये असेही न्यायालयाने म्हटले आहे. विशेष म्हणजे याबाबत राज्य सरकारने एक नियमावली बनवण्याची गरज असून पालक आणि शाळांमध्ये शुल्कवाढीवरून होणारे वाद मिटवण्यासाठीजिल्हास्तरीय यंत्रणा उभारण्याची गरज असल्याची सूचना न्यायालयाने केली अाहे.
वाढीव शुल्क भरले नाही, असे कारण सांगत पुण्यातील ज्ञानगंगा इंटरनॅशनल या शाळेने नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या आपल्या मुलाला काढून टाकल्याच्या विरोधात विजय वाबळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी न्या. व्ही.एम.कानडे आणि न्या. बी.पी.कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर पार पडली. विजय वाबळे यांनी या अगोदरही अनेक वेळा शाळांच्या शुल्कवाढी विरोधात आंदोलने केली आहेत. त्यामुळेच आकसापोटी आपल्या मुलाला शाळेतून काढल्याचा आरोप वाबळे यांनी केला आहे. वाबळे यांनी अनेक वेळा शाळेचे शुल्क भरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शाळा शुल्क स्वीकारत नव्हती, असा दावाही वाबळे यांनी केला आहे.