आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात अवघा एक नगरसेवक निवडून येऊनही आदित्य ठाकरेंचं \'करून दाखवलं!\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उत्तर प्रदेशातील प्रमुख शहरांतील महापालिकांचे आज निकाल आले आहेत. यात बसपा-सपा-काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपने जोरदार मुंसडी मारली आहे. मात्र, तिकडे अलाहाबादमध्ये शिवसेनेचा अवघा एक नगरसेवक निवडून आला आहे. अलाहाबादमधील वॉर्ड. नंबर 40 मधून दीपेश यादव हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. याची दखल घेत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचा भगवा उत्तर प्रदेशात पोहचला असे सांगत तेथील मतदारांचे आभार मानले आहेत.

 

'ही एक सुरूवात आहे. करून दाखवलं! करून दाखवणार! काम करू आणि लोकांची मनंही जिंकू, असे सांगत सर्व मतदारांना धन्यवाद' अशा आशयाचे टि्वट युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे.  

 

शिवसेनेने उत्तर प्रदेशात आज झालेल्या 16 शहरातील सर्व महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. मात्र, केवळ एकच नगरसेवक निवडून आला आहे. याआधी मार्च महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. मात्र, बहुतेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. शिवसेनेला भाजपने दूर केल्यापासून उद्धव ठाकरे यांनी बाहेरील राज्यात स्वबळावर पक्षाचा जम बसविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही.

 

2015 मध्ये बिहारमध्ये शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. तेथेही सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. आता गुजरातमध्ये भाजपला अपशकून घडविण्यासाठी गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांपैकी सुमारे 50 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. भाजपची मते खाण्यासाठीच हार्दिक पटेलच्या सांगण्यावरून ते उमेदवार उभे केल्याचे बोलले जात आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, आदित्य ठाकरे यांनी केलेले टि्वट...

बातम्या आणखी आहेत...