आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्स संमेलन : सकाळच्या चर्चासत्राकडे आयोजकांचे दुर्लक्ष; 9 चा कार्यक्रम 10.15 वाजता सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सावित्रीबाई फुले कलामंदिरमधील सकाळी 9.45 वाजेचा फोटो. - Divya Marathi
सावित्रीबाई फुले कलामंदिरमधील सकाळी 9.45 वाजेचा फोटो.
मुंबई - साहित्य संमेलनात चर्चासत्र आणि परिसंवादांसाठी साहित्य रसिक आवर्जुन उपस्थिती लावत असतात. पण डोंबलिवलीतील साहित्य संमेलनात आयोजकांनी वेळेवर कार्यक्रम घेण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे. शनिवारी सकाळी 9 वाजता ठरलेला कार्यक्रम सुमारे तासभर उशीराने  सुरू झाला. 
 
UPDATES
- सकाळी 10.40 च्या दरम्यान सुरू झाली जयंत म्हसकर यांची मुलाखत.
- टेबल, पुष्पगुच्छ, हार याशिवाय थेट चर्चासत्राला सुरुवात करण्यात आली. 
- उशीर झाल्याने लोकांनी थेट कार्यक्रम सुरू करण्याची विनंती केली. 
- सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे अध्यक्षीय भाषणावरील चर्चासत्र 10.15 वाजता सुरू झाले. 
- शं. ना. नवरे  सभामंडपात 9 वाजता उद्योजक जयंत म्हसकर यांची प्रकट मुलाखत होणार होती. 
- १० वाजले तरी सुरुवात नाही. मोजून वीस एक  प्रेक्षक उपस्थित. 
- कलामंदिर मुख्य कार्यक्रमस्थळापासून दूर अंतरावर आहे.
- याठिकाणी चहा किंवा नाश्त्यासाठी स्टॉल्स नसल्याने साहित्य रसिकांची निराशा झाली आहे. 
- 9 वाजेची वेळ लवकर असल्याने लोक येत नसले तरी आयोजकांनी कार्यक्रमाची तयारी करणे तरी अपेक्षित होते.
- कार्यक्रमाचीही काहीही तयारी नव्हती, अगदी व्यासपीठावर खुर्च्याही लावलेल्या नव्हत्या. 
- माध्यम प्रतिनिधींसह मोजके 40 ते 50 साहित्य रसिक होते मात्र आयोजकांचा पत्ताच नव्हता. 
- सकाळी पाऊणे दहावाजेपर्यंतही येथे काहीही हालचाल नसल्याचे पाहायला मिळाले. 
- सकाळी नऊ वाजता सावित्रीबाई फुले कलामंदिर अध्यक्षीय भाषणावर चर्चासत्र होणार होते. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...