आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Urdu Newspaper Editor Arrested By Mumbra Police Due To Reprinting Charlie Hebdo Cartoon

\'चार्ली हेब्दो\'तील व्यंगचित्र छापल्याने ऊर्दू दैनिकाच्या संपादिकेस ठाण्यात अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- फान्समधील 'चार्ली हेब्दो' या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेले एक वादग्रस्त पुन्हा प्रकाशित केल्याने ठाण्यातील मुंब्रा येथील ऊर्दू दैनिकाच्या संपादिकेस अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर संपादिकेला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 17 जानेवारी 2015 रोजी हे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील मुंब्रा परिसरात अवधनामा नावाचे एक स्थानिक ऊर्दू दैनिक प्रकाशित करण्यात येते. या दैनिकात 17 जानेवारी रोजी चार्ली हेब्दो यांनी प्रसिद्ध केलेले एक वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केले. या दैनिकाच्या संपादक एक महिला असून त्यांचे नाव शिरीन दळवी असे आहे. या दैनिकात हे व्यंगचित्र प्रकाशित झाल्यानंतर मुंब्र्यातील नुसरत अली यांनी जोरदार आक्षेप घेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मात्र, पोलिसांनी सर्वप्रथम काहीच कारवाई न करता बघ्याची भूमिका घेतली. मात्र, पोलिसांनी संबंधित संपादिकेवर कारवाई केली नाही तर पोलिस ठाण्यावर मोर्चा आणू असा इशारा अली यांना दिला. त्याचवेळी अली यांना राष्ट्रीय उलेमा कौन्सिलने साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वाद चिघळू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संपादिका शिरीन दळवी यांना अटक केली. मात्र त्यांनीच कोर्टात हजर करीत जामीन मंजूर करून घेतला आहे.