आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिजाब काढण्यास मुख्याध्यापिकेने दबाव टाकल्याने मुस्लिम शिक्षिकेचा राजीनामा, मुंबईतील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कुर्ल्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने मुस्लिम शिक्षिकेला हिजाब काढण्यास दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित शिक्षिकेने राजीनामा दिला असून तिने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.

पीडित मु‍स्लिम शिक्षिकेने सांगितले की, 'या घटनेचा आपल्याला मोठा धक्का बसला आहे. चार वर्षाच्या करियरमध्ये पहिल्यांदा अशा परिस्थितीचा आपल्याला सामना करावा लागला आहे.'

धर्माविरोधी कृत्य करण्यास दबाव टाकणार्‍या मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्‍याचीही मागणी पीडित शिक्षिकेने विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.

3 वर्षांंपासूून ज्ञानदानाचे काम करत आहे शबीना...
- मीडिया रिपोर्टनुसार, शबीना नाजनीन खान, कुर्ला येथील विवेक इंग्लिश हायस्कूलमध्ये 'इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी' विषय शिकवतात.
- शबीना यांनी सांगितले की, जवळपास तीन वर्षापासून त्या ज्ञानदानाचे काम करत आहे. पण, या काळात त्यांना कोणीच हिजाब काढण्यास सांगितले नाही.
- प्रायमरी सेक्शनच्या मुख्याध्यापिका सविता नायर यांनी पदभार स्विकारताच हिजाब काढण्यास दबाव टाकला.
- शिक्षण घेत असतानाही हिजाब परिधान करूनच कॉलेजात जात असल्याचे शबीना यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, शबीना यांच्या मदतीला धावून आले जय हो एनजीओ...
बातम्या आणखी आहेत...