आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Delegation Meets To Cm Devendra Fadanvis At Mumbai

राज्यात गुंतवणुकीसाठी मोठी संधी, US शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य असून गुंतवणुकीसाठी येथे मोठी संधी उपलब्ध आहे. गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात उद्योग उभारणीसाठी आवश्यक असणारे परवाने जलदगतीने देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
युनायटेड स्टेटचे कॉन्स्युलेट जनरल थॉमस वजदा यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी अपर मुख्य सचिव व मुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी सुमित मलिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात गुंतवणूक वाढावी यासाठी परदेशी गुंतवणूकदारांसमवेत अधिकाधिक सुसंवाद साधला जाईल. उद्योगाला पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून गुंतवणूकदारांना राज्यात सुरु असलेल्या विविध प्रकल्पाची माहिती देण्यात येईल. नागपूर येथील मिहान प्रकल्पातही गुंतवणुकीस मोठा वाव आहे, असेही त्यांनी सांगितले.
युनायटेड स्टेटस् आणि महाराष्ट्र राज्यातील आर्थिक संबंध अधिक दृढमूल व्हावे यासाठी आमची आग्रही भूमिका असून महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे युनायटेड स्टेटस् चे कॉन्स्युलेट जनरल थॉमस वजदा यांनी यावेळी सांगितले. विविध प्रकल्पात होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व सुसंवाद साधण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक केल्यास गुंतवणूकदारांना सोयीचे होईल असेही त्यांनी सांगितले. थॉमस यांच्यासमवेत कॉन्स्युलेटच्या मुख्य श्रीमती डायना अब्दीन, राजकीय व उद्योग विभागाचे मुख्य राज वाधवानी उपस्थित होते.