आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MNS चे बँकांना पत्र; मराठीत व्यवहार करा अन्यथा आंदोलन, RBI च्या नियमांचा दिला हवाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वांद्रे-कुर्ला संकुलातील अलाहाबाद बँक, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकांना आज मनसेकडून पत्र देण्यात आले आहे. लवकरात लवकर बँकांचे व्यवहार मराठी भाषेत सुरु करावेत, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल अशा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.

 

 

व्यवहार मराठीत करा अन्यथा...

18 नोव्हेंबर रोजी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्याला हात घातला होता. बँकांचे व्यवहार मराठीत करा, नाहीतर आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार, आज मनसेकडून बीकेसीमधील बँकांना पत्र देऊन व्यवहार मराठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

 

काय म्हणाले होते राज ठाकरे 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम आहे की, बँकेचा व्यवहार हा संबंधित राज्याच्या प्रादेशिक भाषेनुसारच असावा. मात्र महाराष्ट्रात तसे होताना दिसत नाही. प्रत्येक राज्यात बँकेचा व्यवहार हा त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये होतो, असे राज ठाकरे म्हणाले होते.

 

 

 

पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि माहिती

 

 

 

बातम्या आणखी आहेत...