आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उस्मानाबाद, जालना जिल्हा बँकांवर निर्बंध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उस्मानाबाद, जालना आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी नव्या ठेवी तसेच बचत खात्यातील ठेवी स्वीकारू नयेत, असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिले आहेत.
आरबीआयने म्हटले आहे की, उस्मानाबाद डीसीसी बँक, जालना डीसीसी बँक आणि नंदुरबार डीसीसी या तिन्ही बँकांनी बचत खाते, करंट अकाउंट, मुदत ठेवी, आवर्ती जमा ठेवी या किंवा इतर प्रकारच्या कसल्याही नव्या ठेवी स्वीकारू नयेत. या निर्देशाचा संबंध या बँकांवरील बंदीशी नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. आरबीआय परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, या निर्देशात फेरबदल करणे परिस्थितीवर अवलंबून असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.