आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttarakhand Flood: State Government Not Know Missing Devotee Exact Figure

उत्तराखंड प्रलय: राज्य शासनाला अजूनही बेपत्ता भाविकांची संख्या ठाऊक नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देवभूमी उत्तराखंडमध्ये पावसाच्या हाहाकाराने होत्याचे नव्हते करून टाकले. या भयंकर पुरात राज्यातील शेकडो भाविक अजूनही बेपत्ता आहेत. उत्तराखंड सरकारने राज्यातील 163 जण बेपत्ता असल्याचे सांगितले असले तरी राज्य सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला मात्र बेपत्ता भाविकांचा अजून नक्की आकडा ठाऊक नसल्याचे समोर आले आहे.जूनमध्ये उत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातले होते. चारधाम यात्रेला राज्यातून शेकडो भाविक गेले होते. यामध्ये मराठवाड्यातीलच पाचशेपेक्षा जास्त भाविक होते. काही भाविक या दुर्घटनेतून बचावले आणि राज्यात परत आले. परंतु अजूनही काही भाविक बेपत्ता आहेत. या भाविकांच्या नातेवाइकांना राज्य सरकारने मदत घोषित केली आहे. आपत्कालीन विभागाकडे आपल्या बेपत्ता नातेवाइकांची माहिती घेऊन अनेक जण येत आहेत. मात्र, या विभागाकडे
बेपत्ता नागरिकांची नावे आणि संख्या उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. विभागातील सूत्रांनी माहिती देताना सांगितले की, उत्तराखंड सरकारने एक आकडा जाहीर केला आहे. परंतु त्यापेक्षा जास्त भाविक बेपत्ता असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातून खरे किती भाविक बेपत्ता आहेत याबाबत विचारता विभागाचे उपसचिव अशोक अत्राम यांनी सांगितले की, आमच्याकडे संख्या उपलब्ध नसल्याने किती जण बेपत्ता आहेत ते सांगता येणे कठीण आहे. उत्तराखंड सरकारकडून आम्हाला अजून नक्की आकडा समजलेला नाही. आमच्याकडे जे नागरिक येत आहेत त्यांची माहिती आम्ही
घेऊन ठेवत आहोत.
राज्यातील बेपत्ता भाविकांची संख्या जाणून घेण्यासाठी आपण एक-दोन दिवसात उत्तराखंडला जाणार आहोत असे सांगून उपसचिव म्हणाले की, चार-पाच दिवस मी तेथे राहून तेथील सरकारकडून बेपत्ता भाविकांची माहिती घेऊन येणार आहे. त्यानंतरच बेपत्ता भाविकांची संख्या सांगता येणे शक्य होईल. बेपत्ता भाविकांच्या नातेवाईकांना मदत मिळण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असून एकाही भाविकाच्या नातेवाईकाला मदतीविना राहावे लागणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.