आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी महामंडळात १४ हजार २४७ पदांसाठी मेगाभरती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एसटी महामंडळात तब्बल १४,२४७ जागांसाठी नाेकर भरती हाेणार अाहे. बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारने ही आनंदाची बातमी दिली आहे.  चालक, वाहक, सहायक (मेकॅनिकल) आणि पर्यवेक्षक दर्जाची चौदा हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त असून  ही पदे लवकरच भरणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.
    
एसटी हा ग्रामीण भागातील वाहतुकीचा सर्वात मोठा आधार आहे. गाव तिथे एसटी असे बिरुद मिरवणाऱ्या एसटीला गेल्या काही वर्षांपासून आपल्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी करता अालेली नाही. मात्र, आजही एसटीचा कारभार सुधारला तर जनता अजूनही एसटीवर विश्वास ठेवायला तयार आहे. हा तिढा सोडवण्यामधील मुख्य अडचण होती ती मनुष्यबळाचा अभाव. ही अडचण सोडवण्यासाठी रावते यांनी पुढाकार घेतला आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कोकण विभागात चालक आणि वाहकांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरण्याच्या सूचना दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या सहा विभागांमध्ये  ७९२३ चालक आणि वाहकांची भरती करण्यात येणार आहे.  कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी २५४८ लिपिक, ३२९३  सहायक व ४८३ पर्यवेक्षकांची भरती करण्यात येईल.   

चूक झाल्यास मुदतवाढ   
सात जानेवारीपासून msrte.gov.in आणि msrtexam.in  या वेबसाइटवर जाहिरात असेल. अर्ज भरण्याची मुदत १२ जानेवारी ते ३ फेब्रुवारी असेल. अर्ज भरताना अनावधानाने चुकीची किंवा राहून गेलेली माहिती दुरुस्ती करण्यासाठी ६ ते १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढही उमेदवारांना दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...