आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vacant Post Filled In Water Authority : Advocat Gerneral Diras Khambata

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जल प्राधिकरणातील रिक्त पदांबाबत लवकरच निर्णय : अ‍ॅडव्होकेट जनरल दरायस खंबाटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जल नियामक प्राधिकरणातील अध्यक्ष, सदस्यांची पदे भरण्यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल दरायस खंबाटा यांनी मंगळवारी उच्च न्यायालयाला दिले.

मोहोळ तालुका बहुउद्देशीय शेतकरी संघाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान प्राधिकरणाचा कारभार आलबेल चालत नसल्याची बाब निष्पन्न झाली होती. प्राधिकरणावर सदस्य नसल्याचेही समोर आले होते. या प्रकाराची गंभीर दखल न्यायालयाने घेतली होती. संपूर्ण राज्याचे जल प्राधिकरणाचे कार्यक्षेत्र आहे. त्याचे कामकाज सुरळीत चालेल, याची दक्षता राज्याने घ्यायला हवी. त्यामुळे पदे भरण्यासंदर्भात तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.