आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैभववाडीत नियोजित बसस्थानकाच्या जागेत अतिक्रमण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैभववाडी : बसस्थानकाच्या नियोजित जागेचा ताबा घेण्यासाठी परिवहन मंडळाचे अधिकारी मंगळवारी आले असता सदर जागेत अतिक्रमण असल्यामुळे ती जागा ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. वैभववाडी येथील सर्वे नं.३६'अ'मधील १२८५ चौ.मी.शासकीय जमिनीचा मोबदला ३८ लाख रुपये एस.टी.महामंडळाने महसूल विभागाला दिला आहे. सदर जमीन एस.टी.महामंडळाच्या ताब्यात घेण्यासाठी परिवहन महामंडळाचे विभागीय अभियंता प्रकाश नेरुरकर वैभववाडीत आले होते.
 
नियोजित जागेची पाहणी केली असता सदर जागेत अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले. महसूल खात्याने परिवहन महामंडळाला दिलेल्या एकूण १२८५ चौ.मी.जागेपैकी २२५ चौ.मी. जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोरील उद्यानासाठी अधिगृहीत केल्याचे दिसून आले. त्यामुळे परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सदर जागेचा ताबा घेण्यास स्पष्ट नकार दिला. जेवढ्या जागेचा मोबदला दिला आहे. तेवढी जागा उपलब्ध करुन देण्यास सांगितले. याबाबत परिवहनचे विभागीय अभियंता प्रकाश नेरुरकर, मंडळ अधिकारी एस.एन.खाडे, भुमी अभिलेखचे एस.एस.आलिम यांनी पंचयादी घालून आपल्या वरिष्ठांना कळविले. त्यामुळे एस.टी.बस स्थानकाच्या नियोजित जागेचा प्रश्न जटील बनला आहे. त्यामुळे बस स्थानकाच्या जागेचा प्रश्न आणखी काही दिवस प्रलंबीत राहणार असल्याचे दिसत आहे.
 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...