आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड : वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचे एकतर्फी वर्चस्व, धनजंय मुंडे चारीमुंड्या चीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी येथे वैद्यनाथ बॅंकेसाठी मतदान केल्यानंतर पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि प्रजा मुंडे आणि इतर... - Divya Marathi
परळी येथे वैद्यनाथ बॅंकेसाठी मतदान केल्यानंतर पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि प्रजा मुंडे आणि इतर...
बीड - बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ सहकारी बँकेवर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनेलची एकतर्फी निवडणूक जिंकली. पंकजा मुंडे यांच्या जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व 17 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावत या निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. मात्र, पंकजा मुंडेंनी त्यांना धूळ चारीत चारीमुंड्या चीत केले आहे.
बँकेच्या 17 संचालक पदाच्या जागेसाठी रविवारी मतदान झाले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनल आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ लोकसेवा पॅनलच्या उमेदवारांचे भवितव्य बंद झाले होते. मंगळवारी सकाळी आठ वाजता कुर्ला रोडवरील बाजार समितीच्या आवारात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून पंकजा मुंडेंच्या पॅनेलने आघाडी घेतली होती. पंकजा मुंडेंच्या पॅनेलच्या उमेदवारांना 75 टक्के मते तर धनंजय मुंडेंच्या पॅनेलच्या उमेदवारांना 25 टक्के मते असा एकतर्फी फरक होता.
जनसेवा पॅनलचे विजयी उमेदवार -
लोकनेते गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलमधील उमेदवार उज्ज्वल कोटेचा, अॅड. जयसिंह चव्हाण, अशोक जैन, प्रकाश जोशी, विकास दुबे, प्रवीण देशपांडे, महेश्वर निर्मळे, पुरुषोत्तम भन्साळी, राजाराम मुंडे, संदीप लाहोटी, नारायण सातपुते, विनोद सामत, रमेश कराड, डॉ. प्रीतम मुंडे, सुरेखा मेनकुदळे, दासू वाघमारे, अनिल तांदळे हे विजयी झाले आहेत.
भ्रष्टाचार व घोटाळ्याची माहिती समोर आणली-
मागील काळात बँकेत झालेले गैरप्रकार, भ्रष्टाचार व घोटाळ्याची माहिती बँकेतील निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला सभासदांसमोर मांडण्याची संधी मिळाली. विरोधी पक्षाचे जे काम असते ते आम्ही प्रमाणिकपणे केले आहे. -धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या निवडणुकीबाबत अधिक माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...