आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaikai Nadu News In Marathi, Divya Marathi, Mumbai Metro 3, Prithivira Chavan

‘मुंबई मेट्रो – ३’चे मंगळवारी भूमिपूजन, व्यंकय्या नायडूंनी मुख्‍यमंत्र्यांचे निमंत्रण स्वीकारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई मेट्रो - ३ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन २६ ऑगस्ट रोजी होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या कार्यक्रमासाठी दिलेले निमंत्रण केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वीकारले आहे. दरम्यान, पुणे मेट्रोच्या प्रस्तावाला लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली जाईल, असे नायडु यांनी जाहीर केले.

मुंबई दौऱ्यावर आलेल्या नायडू यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या दाेघांमध्ये झालेल्या बैठकीत राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. मुंबई मेट्राे या महत्वांकाक्षी प्रकल्पासाठी जपानच्या ‘जायका’ने तेरा हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. त्याचबरोबर पुणे मेट्रोच्या प्रस्तावाला लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दलिी जाईल, असे नायडू यांनी जाहीर केले.