आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vaishnavi Mule Aishwarya Mule News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादची वैष्णवी, ऐश्वर्या चीनच्या महोत्सवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चीनची राजधानी बीजिंग येथे २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०१४ या कालावधीत आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील टीसीएच शाळेत दहावीत शिकणाऱ्या वैष्णवी विजय मुळे आणि ऐश्वर्या राजेंद्र मुळे यांच्यासह श्री माता निर्मलादेवी नृत्य झंकारच्या १५ विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. देशातून या संस्थेची निवड या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आहे.

चीन सरकारच्या पर्यटन, सांस्कृतिक विभाग आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेल्या वर्षी ग्वाल्हेरमध्ये एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सात देशांनी भाग घेतला होता अशी माहिती ऐश्वर्या मुळेने दिली. या स्पर्धेत संस्थेतर्फे राजस्थानी नृत्य कालबेलिया सादर करण्यात आले होते. या नृत्याने सगळ्यांची मने जिंकल्याने श्री माता निर्मलादेवी नृत्य झंकारला आमंत्रित करण्यात आल्याते वैष्णवीने सांगितले.

दोघीही सहाव्या वर्षापासून मीरा पाऊसकर यांच्याकडे शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले असून दोघीही भरतनाट्यमवर जास्त भर दिलेला आहे. विशाखा लाळीकर, नवेली देशमुख, वैष्णवी सोळुंके, ऐश्वर्या ताठी, देशना फुलंब्रीकर, रेणुका घोले पाटील, मानसी पत्की, गीतांजली कातनेश्वरकर, सायली टाकळकर, वैष्णवी कुलकर्णी, मृण्मयी शिरढोणकर, अंचिता मिश्रा, आस्था खंडेलवाल या विद्यार्थिनीही या आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत संस्थेच्या संचालिका मीरा पाऊसकर, दीपक पाऊसकर, प्रज्ञा लाळीकर, डॉ. मंजुश्री विजय मुळे, मेघना शिराढोणकरही चीनला जाणार आहेत.