आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई मनपाच्या शाळांमध्ये वंदे मातरम‌् होणार सक्तीचे, आठवड्यातून दोनदा होणार गायन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘वंदे मातरम’वरून विधिमंडळात गोंधळ झाला असला तरी मुंबई महापालिकांच्या शाळांत मात्र आता आठवड्यातून दोनदा सोमवार व शुक्रवारी वंदे मातरमचे गायन होणार आहे. भाजप नगरसेवक संदीप पटेल यांनी पालिका सभागृहात याविषयी ठरावाची सूचना मांडली होती. गुरुवारी महापौरांनी ती मंजूर केल्याची घोषणा केली. या मुद्द्यावरून महापालिका सभागृहात जाेरदार हंगामा झाला. विरोधकांनी ठरावाला विरोध केल्यानंतर तो मंजूर केल्याबद्दल समाजवादी पक्ष, एमआयएमच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. ठरावाची सूचना आता पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवली जाणार आहे. 
  
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा आणि मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व अनुदानित शाळांमध्ये सोमवारी व शुक्रवारी ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय देशभक्ती गीत  सक्तीने म्हणावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. राष्ट्रगीत जन गण मनप्रमाणे ‘वंदे मातरम’लाही भारतीयांच्या मनात अढळ स्थान आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत करण्यात या गीताचा हातभार लागतो.  यासाठी चेन्नई उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आठवड्यातून एकदा सोमवारी किंवा शुक्रवारी ‘वंदे मातरम’ म्हणावे, असा आदेश दिला असल्याचा दाखला पटेल यांनी दिला होता.    

सदर ठरावाची सूचना पालिका सभागृहात गुरुवारी मंजुरीसाठी आली होती. ठरावाची सूचना पटेल वाचत असतानाच समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी यावर बोलायला परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, महापौरांनी शेख यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने समाजवादी पक्षासह विरोधी पक्षातील मुस्लिम नगरसेवकांनी सूचनेवर मतदानाची मागणी केली. महापौरांनी बोलण्याच्या  मागणीप्रमाणेच मतदानाची मागणी धुडकावून लावत ठरावाची सूचना मंजूर केली. यामुळे महापौरांच्या या प्रकाराचा निषेध करत चसमाजवादी पक्षाच्या सहा, एमआयएमच्या एक व  काँग्रेसच्या नियाज वणू यांनी सभात्याग केला. या आधीही १९९८ मध्ये शिवसेनेने वंदेमातरम सक्तीचे करण्याची मागणी केली  होती.   

इतरांना वंदे मातरमचा त्रास का?  
देश स्वतंत्र होण्यापूर्वी सर्वधर्मीय स्वातंत्र्यसैनिक वंदे मातरम म्हणायचे.  अनेकांनी वंदे मातरम म्हणत छातीवर गोळ्या खात बलिदान दिले आहे. ए. आर. रेहमानसारख्या ख्यातनाम संगीतकारानेही वंदे मातरम हे गाणे गायले आहे. मग इतरांना त्याचा त्रास काय? वंदे मातरम म्हणायचे नसल्याने पालिका सभागृहात मुस्लिम सदस्य उभे राहतात. त्याचप्रमाणे शाळांमध्येही मुस्लिम विद्यार्थी उभे राहू शकतात, अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते मनोज कोटक यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...