आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vasant Purke, BJP MP Prakash Javdekar Give Back Their Home To Government

कारवाईच्या धास्तीने वसंत पुरके, भाजप खासदार प्रकाश जावडेकर यांच्याकडील घरे सरकारकडे जमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबंई - मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेतलेल्यांची यादी जाहीर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला आदेश दिल्याने अनेक दिग्गज नेत्यांचे धाबे दणाणले आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके यांच्या पत्नी प्रेमलता पुरके आणि भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांचा मुलगा अपूर्व यांनी आपल्या सदनिका सरकारला परत केल्या.
मुख्यमंत्री कोट्यातली घरे ही समाजासाठी विशेष योगदान देणार्‍यांना आणि ज्यांचे मुंबईत स्वत:चे घर नाही अशा विशेष घटकांसाठी असतात. मात्र अनेक राजकारण्यांनी आपले नातेवाईक, हितचिंतकांच्या नावे मोक्याच्या ठिकाणची एकापेक्षा जास्त घरे लाटली आहेत. याबाबत एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला एकापेक्षा जास्त घरे लाटलेल्यांची यादी सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळेच संभाव्य कारवाईच्या भीतीने धास्तावलेल्यांनी आता आपल्या नावे असलेली अधिकची घरे परत करण्याचा सपाटा लावला आहे.
आतापर्यंत किती जणांनी कोट्यातले फ्लॅट्स परत केले आहेत याबाबतची माहिती मुंबईच्या अप्पर जिल्हाधिकार्‍यांकडे मागितली असता जावडेकर आणि पुरके यांच्या नातेवाईकांनी घरे परत केल्याची बाब उघड झाली आहे. यापैकी पुरके यांनी अन्य सरकारी योजनेतून अगोदरच एक सदनिका घेतली असून जावडेकर यांच्या दुसर्‍या मुलाच्या नावे एक सदनिका आहे.
फौजदारी कारवाईची मागणी
एकापेक्षा जास्त सदनिका असलेल्या ज्या ज्या लोकांनी आपल्या सदनिका सरकारला परत केल्या आहेत, त्यांची यादी बनवण्याचे काम सुरू असल्याचे मुंबईच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कळण्यात आले आहे. ही माहिती मागवणारे सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव जे. एच. सहारिया यांच्याकडे अशा लोकांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.