आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षांमधील त्रुटीबाबत त्वरित कारवाई करा : वायकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एप्रिल-मे २०१५ मध्ये अकृषी विद्यापीठात घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये ज्या त्रुटी आढळून आल्या त्या त्रुटी होण्यास जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर महाराष्ट्र विद्यापीठे अधिनियम, १९९४ च्या तरतुदीनुसार कडक कारवाई करावी. तसेच अशा प्रकारांना आळा बसवण्यासाठी आपण काय उपाययोजना केली याचा संपूर्ण अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण तसेच गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांमधील कुलगुरूंना दिले आहेत.

राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये विविध अभ्यासक्रमांमध्ये एप्रिल-मे २०१५ च्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये निदर्शनास आलेल्या अक्षम्य चुका/विद्यापीठ प्राश्निकांचा (पेपर सेटर) निष्काळजीपणा, प्रश्नांबाबतच्या गंभीर त्रुटी इत्यादीबाबत सभागृहात तारांकित प्रश्न अपस्थित करण्यात आला. या प्रश्नांंवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करताना, बऱ्याच विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या अनेक विषयांच्या सदोष प्रश्नपत्रिका छापून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्याने त्या सोडवताना त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तर काही विद्यापीठाच्या अक्षम्य चुकांमुळे फेरपरीक्षा घेण्याची वेळ आली हाेती.