आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषदेसाठी ९८.३६% मतदान, २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्य विधान परिषदेच्या सहा जागांसाठी शनिवारी झालेल्या मतदानात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ९८.३६ टक्के सदस्य मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शनिवारी सकाळी ८.०० वाजता मतदानाला सुरुवात होऊन ४.०० वाजता संपले. २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, ग्रामपंचायतीच्या निर्वाचित सदस्यांनी यासाठी मतदान केले. नांदेडमध्ये ४७२ पैकी ४७१ सदस्यांनी, जळगावमध्ये ५४९ पैकी ५४६ सदस्यांनी मतदानात भाग घेतला. पुण्यात एकूण ६९८ मतदारांपैकी ६५८ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यवतमाळमध्ये ४३९ पैकी ४३३ मतदारांनी मतदान केल्याचे राज्य निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
सातारा-सांगली जागेसाठी ५७० पैकी ५६९, भंडारा-गोंदिया जागेसाठी सर्व ३८७ सदस्यांनी मतदान केले. विद्यमान विधान परिषद सदस्यांची सहा वर्षांची मुदत ५ डिसेंबर रोजी संपत आहे. यामध्ये चार राष्ट्रवादी काँग्रेस, प्रत्येकी एक भाजप व काँग्रेसचा आमदार आहे. राष्ट्रवादीकडे सध्या सांगली-सातारा, यवतमाळ, भंडारा-गोंदिया व पुण्याची जागा आहे. नांदेडची जागा सध्या काँग्रेसच्या ताब्यात अाहे.
बातम्या आणखी आहेत...