आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना \'अभ्यासांजली\', \'व्हीजीटीआय\'चे विद्यार्थी करत आहे 18 तास अभ्यास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हीजीटीआयचे विद्यार्थी 18 तास अभ्यास करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासांजली वाहत आहेत. - Divya Marathi
व्हीजीटीआयचे विद्यार्थी 18 तास अभ्यास करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासांजली वाहत आहेत.
मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देश - विदेशात विविध व्याख्यान आणि प्रबोधनपर कार्यक्रम होत असतात. मुंबईतील व्हीजीटीआयमध्ये मात्र यंदा वेगळ्या पद्धतीने घटनाकाराला आदरांजली वाहिली जात आहे. येथील विद्यार्थ्यांनी 18 तास अभ्यास करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्याचा निश्चय केला आहे. रविवारी सकाळी 6 वाजता विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे. 
 
बाबासाहेब करत होते 18-18 तास अभ्यास 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'शिका-संघटीत व्हा-संघर्ष करा' या मंत्रासोबतच 'कायम विद्यार्थी राहा' असाही संदेश दिलेला होता. 
- विद्यार्थी असणं हे बाबासाहेबांना सर्वाधिक प्रिय होते. विदेशात शिक्षण घेत असताना त्यांच्याकडे फार कमी कालावधी होता आणि त्यांची ज्ञानाची भूक प्रचंड होती. त्यासाठी बाबासाहेब 18 ते 20 तास अभ्यास करायचे. 
- ग्रंथालय सुरु होण्या अगोदर विद्यार्थीदशेतील आंबेडकर तिथे हजर असायचे आणि ग्रंथालय बंद होतानाही.  
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अभ्यासाबद्दली ओढ आजच्या पिढीत निर्माण करण्यासाठी व्हीजीटीआयमध्ये महामानवाला 18 तास अभ्यास करुन अभ्यासांजली अर्पण करण्यात येत आहे. 
 
काय आहे व्हीजीआयटी 
- व्हीजीआयटी अर्थात वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट हे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. 
- मुंबईमधील हे महाविद्यालय आशियामधील सर्वात जुने अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...