आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याबाहेर न जाणाऱ्या वाहनांचे क्रमांक मराठीत - रावते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याबाहेर न जाणाऱ्या वाहनांचे क्रमांक हे देवनागरी लिपीत असावेत यासाठी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. गडकरी यांनी या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता देऊन तसे आदेश काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती मंत्री रावते यांनी दिली. रावते म्हणाले की, राज्यात मागच्या वेळी परिवहन मंत्री असताना वाहनांवरील क्रमांक मराठी भाषेत असावेत यासाठी आग्रह धरला होता, परंतु, त्या वेळी केंद्र सरकारने इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेत क्रमांक असावेत, असे आदेश दिले. त्यामुळे त्या वेळी वाहनांवर दोन्ही भाषेतील क्रमांक लावण्यासंदर्भातील आदेश काढण्यात आले. आता राज्याबाहेर न जाणाऱ्या वाहनांवरील क्रमांक मराठी भाषेतच असावेत, अशी मागणी केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन देऊन केली आहे.
बातम्या आणखी आहेत...