आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र व राज्याने \'टीम इंडिया\'सारखे काम करावे- व्यंकय्या नायडूंची अपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई मेट्रो रेल्वे सेवेचा ठाण्यापर्यंत विस्तार करण्याचा केंद्र सरकारचा मानस असून मुंबई शहर रिंगरोड मेट्रोने जोडले जावे तसेच राज्य आणि केंद्र सरकारने टीम इंडियाप्रमाणे देशाच्या विकासात योगदान द्यावे, अशी अपेक्षा केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी व्यक्त केली.

मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे मरोळ येथे भूमिपूजन झाले, त्या वेळी नायडू बोलत होते. मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरात मेट्रो रेल्वे काळाची गरज आहे. जनतेला चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रित कार्य केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. राजकारण निवडणूक काळापुरतेच मर्यादित राहिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्य सरकार महापािलका यांच्याकडून प्रस्ताव येण्यास विलंब लागल्यानेच पुणे मेट्रोची मंजुरी रखडली होती. मात्र, आता प्रस्ताव प्राप्त झाले असून केंद्र सरकार दोन- तीन दिवसांत हा प्रकल्प मंजूर करेल, असे आश्वासनही नायडू यांनी दिले.

महाराष्ट्रच आघाडीवर -मुख्यमंत्री : विकासामध्येदेशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री चव्हाण यांनी मंगळवारी केला. तसेच नायडू यांनी अत्यंत कमी वेळात मेट्रोच्या भूमिपूजनाचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार मानले. केंद्र आणि राज्य यांच्या सहयोगाने राष्ट्र विकासात प्रगती साधेल, असा चिमटा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत झालेल्या अवमानाची चव्हाण यांनी आठवण करून दिली. वरळी-शिवडी उड्डाण रस्ता, मुंबईला ठाण्यापर्यंत जोडणारा मेट्रो टप्पा चार या २० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने आर्थिक साहाय्य पुरवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, अल्पसंख्याक विकासमंत्री नसीम खान, महिला बालिवकासमंत्री वर्षा गायकवाड, खासदार किरीट सोमय्या खासदार गजानन कीर्तिकर, खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते.

मुंबईकरांची निदर्शने :मेट्रोचा दुसरा टप्पा अद्याप सुरू झालेला नसताना तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यामुळे भूमिपूजन स्थळी राज्य शासनाच्या विरोधात मुंबईकरांनी निदर्शने केली.

आणखी पुढे वाचा व छायाचित्रे पाहा...