आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Verdict On Salman's Appeal In Hit and run Case On June 10

\'हिट अँड रन\'प्रकरण : सलमानच्‍या आव्‍हान याचिकेवर निर्णय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'हिट अँड रन' प्रकरणी अभिनेता सलमान खानच्‍या याचिकेवर सत्र न्‍यायालय सोमवार 10 जून रोजी निर्णय सु‍नावणार आहे. खटल्‍याची नव्‍याने सुनावणी करण्‍याच्‍या निर्णयाविरुद्ध सलमानने याचिका दाखल केली होती. त्‍यावर मे महिन्‍यात युक्तीवाद पूर्ण करण्‍यात आला होता.

2002 मध्‍ये घडलेल्‍या या प्रकरणात सलमानविरुद्ध सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा दाखल करुन नव्‍याने सुनावणीचे आदेश कनिष्‍ठ न्‍यायालयाने दिले होते. त्‍याविरुद्ध सलमानने याचिका दाखल केली होती. कोणत्‍याही हेतूने ही सलमानने हे कृत्‍य केले नव्‍हते. त्‍यामागे कोणाचीही हत्‍या करण्‍याचा हेतू नव्‍हता, असे सलमानच्‍या वकीलाने दावा केला होता.

सलमानविरुद्ध सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा सिद्ध झाल्‍यास त्‍याला 10 वर्षांच्‍या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यापूर्वी सलमानवर हलगर्जीपणामुळे मृत्‍यूस कारणीभूत ठरल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. त्‍यावर सुनावणी करताना न्‍यायालयाने आणखी एक गुन्‍हा दाखल करुन सत्र न्‍यायालयाकडे प्रकरण पुन्‍हा सुनावणीसाठी पाठविले होते.