आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळमधील अतिक्रमणे त्वरित हटवण्याचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक वारसा असलेल्या अजिंठा, वेरूळ लेणी येथे जगभरातून पर्यटक येतात. पर्यटकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच येथील अतिक्रमणे त्वरित हटवून पुन्हा अतिक्रमण होणार नाही याकडे लक्ष देण्याचे निर्देश पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी बुधवारी दिले.

औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासंदर्भात बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. आमदार प्रशांत बंब, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन-नानौटिया, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह आदी उपस्थित होते.

पावसाळ्यात अजिंठा लेणी परिसरात दरडी कोसळतात. त्यावर तातडीने उपाय करावेत. तसेच एमटीडीसीच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. पर्यटकांना सुरक्षा व करमणूक साधने उपलब्ध करून देण्यात यावीत. सुरक्षेच्या दृष्टीने येथे आणखी एक पोलिस ठाणेही मंजूर केलेले आहे. या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश शिंदे यांनी दिले.

वेरूळ महोत्सवाचे नियोजन करा
संरक्षणाच्या दृष्टीने संरक्षक भिंती बांधणे, पर्यटकांच्या वाहनांसाठी वाहनतळ सुविधा तसेच योग्य तिकीट आकारणी व स्वच्छता राखण्यावर भर देण्यात यावा, त्याचबरोबर स्थानिक जनतेत स्वच्छतेबद्दल जागृती करावी. या वर्षी वेरूळ महोत्सवासाठी योग्य नियोजन करून त्या दृष्टीने कार्यवाही सुरू करावी, अशा सूचनाही शिंदे यांनी या वेळी दिल्या.
बातम्या आणखी आहेत...