आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Soon Construction Law Come In State , Ajit Pawar Give Information

बांधकामप्रकरणी राज्य सरकार लवकरच नवा कायदा करणार, अजित पवारांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जुन्या इमारती तर ढासळतातच, पण आता नव्या इमारती कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब गंभीर असून इमारत बांधकामप्रकरणी राज्य सरकार लवकरच नवा कायदा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गुरुवारी राष्‍ट्रवादीच्या मुख्य कार्यालयात जनता दरबार पार पडला, त्या वेळी ते बोलत होते.


पवार म्हणाले, नव्या इमारती पडणे गंभीर बाब आहे. बांधकामाचे निकष काटेकोरपणे पाळले जात नाहीत. त्यामुळे नव्या इमारती कोसळत असाव्यात. नगरविकास खाते इमारत बांधकामबाबतचे निकष काय असतावेत याविषयी एक प्रस्ताव तयार करणार आहे. तो प्रस्ताव लकवरच मंत्रिमंडळासमोर सादर होईल.


या नव्या कायद्यामुळे दुय्यम दर्जाचे बांधकाम साहित्य वापरणारे आणि इमारत आराखाड्याबाबत हलगर्जीपणा दाखवणारे वास्तुरविशारद यांच्यावर चाप बसेल, असे पवार यांनी सांगितले.


आजवरच्या इमारत दुर्घटना
* 4 एप्रिल - लकी कंपाऊंड (मुंब्रा) 74 ठार
* 10 जून - अल्ताफ मॅन्शन (माहिम) 10 ठार
* 20 जून - स्मृती (मुंब्रा) 10 ठार
* 21 जून - पीयूष (दहिसर) 07 ठार
* 4 जुलै - बिग गारमेंट (भिवंडी) 03 ठार